शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नगरहून श्रीरामपूरला पाठविला, अंत्यविधीनंतर जिल्हा रुग्णालयाला आली जाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:21 IST

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : एका ६० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : एका ६० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. 

शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. घडलेल्या या गंभीर चुकीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून आता सारवासारव केली जात असून प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

श्रीरामपूर येथील एका ६० वर्षीय रुग्णाला बुधवारी छातीत दुखू लागल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. मात्र त्यास न्यूमोनियाची लक्षणे आढळल्याने नगर येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान रुग्णाला सिविलमध्ये भरती करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली.

शनिवारी पहाटे या रुग्णाचा सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. मृतदेह रुग्णवाहिकेतून श्रीरामपूरला नेण्यात आला. हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सकाळी कुटुंबीय व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रुग्णावर अंत्यसंस्कार सुरू असताना जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाºयाने कुटुंबीयांना फोन करत मृतदेह पुन्हा नगरला पाठवण्याची विनंती केली. रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी सूचना केली. मात्र तोपर्यंत अंत्यसंस्कार पूर्ण झाले.

जिल्हा रुग्णालयामधील महिला कर्मचाºयाने आपण रुग्णाच्या वार्डाची प्रमुख आहोत. सकाळी मृतदेह ताब्यात देणाºया कर्मचाºयाला तो कोरोनाचा रुग्ण असल्याची माहिती नव्हती, असे कुटुंबियांना सांगितले. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी रुग्णाचा मृतदेह परत नगरला पाठवण्याचे मला सांगितले आहे, असेही कर्मचाºयांनी स्पष्ट केले.

अधिकाºयांनी काय केला खुलासा?दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते सारवासारव करताना दिसले. रुग्णावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारावेळी दहा ते बारा लोक उपस्थित होते व त्यांनी पीपीई कीट परिधान केले होते. तसेच मृतदेह संपूर्णपणे झाकण्यात आलेला होता ,असा बचाव केला. मात्र मृतदेह नगरहून येथे आणता येत नाही अशी कबुली दिली. रुग्णाच्या कुटुंबातील नऊ जणांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासले जाणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र कुटुंबियांना शुक्रवारी रात्रीच विलगीकरण कक्षात हलवण्यात आले होते.

कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह इतर ठिकाणी हलवला जात नाही तसेच तो कुटुंबीयांच्या ताब्यात देता येत नाही. जिल्हा रुग्णालयाने गंभीर हलगर्जीपणा केल्याचे दिसते आहे. श्रीरामपूर येथील प्रशासनानेदेखील हा धोका ओळखला नाही. रुग्णाचा मृतदेह शहरात आणण्यात आला. तेथे सर्व धार्मिक क्रिया पार पडल्या. आसपासच्या लोकांची गदीर्ही जमली होती. येथील सामाजिक कार्यकर्ते एड समीन बागवान यांनी याप्रकरणी प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.