अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एकाच दिवसात ७८९ रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये पारनेर तालुक्यात सर्वाधिक १५८ रुग्णांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्याही ३ हजार ८११ इतकी झाली आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्या सातशेपार गेल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०० आणि अँटिजेन चाचणीत ३४३ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये पारनेर तालुक्यात सर्वाधिक १५८, तर पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत या तिन्ही तालुक्यांमधील रुग्णांची संख्याही ८०च्यावर गेली आहे. नगर शहरातील रुग्णांमध्ये वाढ होत असून गुरुवारी ३१ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
---------
एकाच दिवसातील पॉझिटिव्ह
पारनेर (१५८), पाथर्डी (८८), श्रीगोंदा (८७), कर्जत (८१), संगमनेर (६६), जामखेड (५५), शेवगाव (४८), अकोले (३६), नगर ग्रामीण (३२), नगर शहर (३१), नेवासा (२९), कोपरगाव (२२), राहाता (१८), श्रीरामपूर (१४), राहुरी (१२), इतर जिल्हा (८), भिंगार (३), मिलिटरी हॉस्पिटल (१), एकूण (७८९)
-----------
पारनेरमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण(२१ जुलै)
नगर शहर (१५६), अकोले (१३४), जामखेड (२७९), कर्जत (३११), कोपरगाव (१३४), नगर ग्रामीण (१८१), नेवासा (१८३), पारनेर (५२५), पाथर्डी (३३३), राहाता (१३७), राहुरी (८३), संगमनेर (४८०), शेवगाव (२६४), श्रीगोंदा (१६५), श्रीरामपूर (१०३), भिंगार (१४), मिलिटरी हॉस्पिटल (०), इतर जिल्हे (७८), एकूण (३५६०) असे २१ जुलै रोजी सक्रिय रुग्ण होते. त्यात पुन्हा गुरुवारी वाढ झाली आहे. सध्या पारनेर तालुक्यात पाचशेपेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत.
-------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,८१,२३८
उपचार सुरू असलेले रुग्ण : ३८९१
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६०९०
एकूण रुग्णसंख्या : २,९१,२१९