शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वादळ वाºयातही हटले नाहीत कोरोनायोद्धे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:06 IST

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील चेकनाक्यावर तैनात असणाºया पोलीस बांधवांनी भयानक ‘निसर्ग’ वादळ वाºयातही आपले कर्तव्य बजावताना हे कोरोनायोद्धे मागे हटले नाहीत.

संदीप घावटे लोकमत न्यूज नेटवर्कदेवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील चेकनाक्यावर तैनात असणाºया पोलीस बांधवांनी भयानक ‘निसर्ग’ वादळ वाºयातही आपले कर्तव्य बजावताना हे कोरोनायोद्धे मागे हटले नाहीत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदीचा आदेश लागू आहे. गेल्या अडीच तीन महिन्यापासून बेलवंडी पोलीस व शिरूर पोलीस या चेकनाक्यावर तैनात आहेत. भर उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेत खडा पहारा या जिल्हा हद्दीवर देण्याचे काम त्यांनी केले.सध्या निसर्ग वादळामुळे पाऊस, वादळ, गारवा या नैसर्गिक आपत्तीतही हे कोरोना योद्धे जिल्हयात विनापरवानगी प्रवेश रोखण्यास सतर्क आहेत. वादळ वाºयातही अनेक प्रवासी वाहनांची वर्दळ नगर-पुणे महामार्गावर सुरू आहे. यावेळी या ‘निसर्ग’ संकटात कुठलीही विश्रांती न घेता जिल्हयात येणाºया पाहूण्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक वाहनांची कडक तपासणी पोलीसांकडून केली जात होती. बुधवारी दिवसभर वादळ व पाऊस यामुळे दूभाजकावर निवाºयासाठी बनवलेला तात्पुरता मंडप वादळात फाटून गेला. त्यामुळे पोलीसांच्या अडचणीत भरच पडली आहे. कोरोना महामारी व निसर्ग वादळ अशा दुहेरी संकटात समाजासाठी हे पोलीस बांधव सेवा देत कर्तव्य बजावत आहेत.कर्जतचे पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, कर्जतचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक बोºहाडे, सुपा येथील पोलीस उपनिरीक्षक कोसे हे आपल्या पोलिसांसह वादळवाºयात चोख बंदोबस्त ठेवत आहेत.--या गव्हाणेवाडी चेक नाक्यावर एक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी यांच्यासह चार होमगार्ड, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांचेही कर्मचारी पाऊस, वादळ वाºयात कर्तव्य बजावत आहेत. पावसापासून सरंक्षणासाठी पक्का निवारा, रेनकोट सध्या आवश्यक आहेत. याची वरीष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.  --फोटो-०४ चेक नाकागव्हाणेवाडी येथे चेक नाक्यावर पाऊस ,वादळ वाºयातही वाहनांची कडक तपासणी करत पोलीस दलातील कोरोना योद्धे मागे हटले नाहीत.