शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST

अहमदनगर : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १६ जानेवारी ...

अहमदनगर : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १६ जानेवारी रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार असून, यात जिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

कोरोना लसीकरणासंदर्भातील सर्व तयारी आरोग्य विभागाने पूर्ण केली आहे. १३ जानेवारी रोजी पुण्याहून लसीचे डोस अहमदनगर येथे आणण्यात आले. तेथून जिल्हा परिषदेच्या केंद्रात त्याची साठवणूक करण्यात आली. तेथून १४ जानेवारीला या लसीचे वितरण संबंधित लसीकरण केंद्रांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.

........................

येथे होणार लसीकरण

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय, कर्जत उपजिल्हा रुग्णालय, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यात येणार आहे.

.............

लसीकरणासाठी ३१ हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी

जिल्ह्यात ३१ हजार १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात या १२ केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यासाठी ३९ हजार लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवशी १०० जणांना प्रत्येक केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

.................

ओळख पटली तरच लस

लसीकरणासाठीचा प्रोटोकॉल ठरवून देण्यात आला असून, पोर्टलवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख पटविली जाणार आहे. ओळख पटली तरच त्यांना प्रतीक्षा कक्षात बसविले जाईल. नंतर त्यांना लस टोचली जाणार आहे. लस दिलेल्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी सांगितले जाईल. कोणताच त्रास होत नाही, असे निदर्शनास आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.