शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कोरोना उपचार केंद्राला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : पालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना उपचार केंद्रासाठी अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक ...

श्रीरामपूर : पालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना उपचार केंद्रासाठी अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी त्यासाठी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य घोषित केले आहे.

पालिकेच्या वतीने नागरिकांसाठी हे केंद्र सुरू करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने उभारणीचे नियोजन सुरू केले आहे. साहित्य खरेदीसाठी दानशूरांकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

नगराध्यक्षा आदिक यांनी रुग्णांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी दिवंगत गोविंदराव आदिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य घोषित केले आहे.

गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शहरातील २० हजार कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले होते. त्यात गहू, डाळ तांदूळ, तेल व मसाले यांचा समावेश होता. ३२ नगरसेवकांच्या प्रभागात सर्व गरीब व गरजू घटकांना याचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी योग्य नियोजन करण्यात आले होते. दिव्यांगांना ही मदतीच्या किटचे वाटप केले.

सॅनिटायझर, मास्क व ग्रामीण रुग्णालय, संत लूक हॉस्पिटल, युनिटी हॉस्पिटल येथे वाफ घेण्याचे मशिन दिले. सर्व आशा वर्कस यांना पीपीई किट, एन ९५ मास्क दिले होते. कृषक समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आदिक यांनी आयोजन केले होते.

समाजातील इतरही दानशूरांनी पुढे येत पालिकेच्या कोरोना केंद्राला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

-------

पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची भेट

पालिकेच्या कोरोना केंद्रासाठी नगराध्यक्षा आदिक यांनी पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची भेट दिली. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे त्यांनी या मशीन सुपूर्द केल्या. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, रईस जहागीरदार, शिवसेनेचे सचिन बडधे, अल्तमेश पटेल, रवी पाटील, डॉ. सचिन पर्हे, डॉ. संकेत मुंदडा आदी उपस्थित होते.

---------