रुईछत्तीसी : वडगाव तांदळी (ता. नगर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना रॅपिड अँटिजन शिबिर घेण्यात आले. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी बांधित रुग्णांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला अशी लक्षणे जाणवत आहेत त्यांनी शिबिरात चाचणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी सविता ससाणे यांनी केले आहे. शिबिरात एकूण ९० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ११ जण कोरोनाबाधित आढळून आले. वडगाव ६, राळेगण १, मठपिंप्री १, रुईछत्तिसी ३ अशी रुग्णांची संख्या आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भापकर, आरोग्य अधिकारी सविता ससाणे, ग्रामसेवक राजळे, सरपंच अनिल ठोंबरे, उपसरपंच वैभव मुनफन, डॉ. हिवाळे, संदीप भालसिंग, आशा सेविका विजया लंके, वर्षा घोंगडे, रंजना धाडगे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
वडगाव तांदळी येथे कोरोना चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST