गोदावरी बायोरिफायनरीजच्या कार्यस्थळावर गेली अनेक वर्षे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव भव्य स्वरूपात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत साजरे केले जातात. यासाठी कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आपल्या पगारातून आर्थिक वर्गणी देऊ करतात. गेल्या दीड वर्षापासून जागतिक कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. यातून अनेक लोक आपल्यातून हिरावली. कारखान्याचे अल्पवयातील कर्तबगार तीन अधिकारी व पाच कामगार यांच्यावर कोरोनाने घाला घातला. यामध्ये सोमैया उद्योग समूहाचे संचालक डी. व्ही. देशमुख, उपव्यवस्थापक विशाल वडांगळे, कृषी अधिकारी रमेश पडियार, महेद्र बागुल, विलास निकम, परसराम खुमकर, काकासाहेब ओहळ, भरत दंडगवाळ यांचा समावेश आहे.
कुटुंबीयांना मदतीचे धनादेश सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, सरव्यवस्थापक अनिलकुमार सिंग, उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, वरिष्ठ कामगार अधिकारी संजय कराळे, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी अरुण बोरणारे यांच्या हस्ते शुक्रवारी देण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी रायभान गायकवाड, रवींद्र भोकरे, विशाखा निळे, शिरीष कुलकर्णी, अशोक निळे, सुनील बाविस्कर, दत्ता शेलार, गणेश पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते.
...........
फोटो११ कोपरगाव