शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे इस्त्रोची शैक्षणिक सहल स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रोला जाणारी शैक्षणिक सहल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या शिक्षण समितीत घेण्यात आला. तसेच हैदराबाद येथे जाणारी सहलदेखील स्थगित करण्यात आल्याची घोषणा समितीकडून करण्यात आली       आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रोला जाणारी शैक्षणिक सहल कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या शिक्षण समितीत घेण्यात आला. तसेच हैदराबाद येथे जाणारी सहलदेखील स्थगित करण्यात आल्याची घोषणा समितीकडून करण्यात आली       आहे. ‘कोरोनाच्या दाढेत विद्यार्थ्यांना ढकलणार का?’ अशा मथळ््याखाली ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकातून लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिकारी आणि पालकांनी ही बाब गंभीरपणे घेतली. त्यात याच वृत्ताच्या आधारे सभेच चर्चा झाली. अध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा झाली. सभेस उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते. नोव्हेल कोरोना विषाणूची लागण देशातील काही राज्यात झाली आहे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची केरळमधील थुंबा येथे जाणारी सहल रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ४२ विद्यार्थ्यांची इस्त्रो सहलीसाठी निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह ८ कर्मचारीही सहलीला जाणार होते. ही सहल स्थगित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या समग्र अंतर्गत जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल हैदराबाद येथे जाणार होती. ही सहलही समितीकडून स्थगित करण्यात आली आहे. या दोन्ही सहलीच्या पुढील तारखा पदाधिकाºयांशी चर्चा करून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.