शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत

By चंद्रकांत शेळके | Updated: April 6, 2023 15:37 IST

दोन महिन्यांपासून हळूहळू राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : दोन महिन्यांपासून हळूहळू राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. दररोज दीडशेहून अधिक रूग्ण राज्यात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत रूग्ण वाढले तर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात सध्या साडेतीन हजारांहून अधिक ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. देशातही रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र तसेच राज्याच्या आरोग्य विभागाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संजय घोगरे, तसेच ग्रामीण रूग्णालयांचे अधीक्षक उपस्थित होते. कोरोना नियंत्रणासाठी अधिकाधिक चाचण्यांवर भर द्यावा. रूग्णसंख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावेत. शासकीयसह खासगी रूग्णालयांनी सज्ज राहावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.ॲाक्सिजन पुरवठा ठेवा 

संशयित रूग्णांच्या जास्तीत जास्त ॲन्टीजेन चाचणी करा. जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालयांमधील कोरोना बेड सुसज्ज ठेवा, शासकीयसह खासगी रूग्णालयांमध्येही ॲाक्सिजन सिलेंडर उपलब्ध करा. गर्दीच्या व बंद खोल्यांत मास्क वापरा. आजारी वाटत असल्यास किंवा श्वसनाच्या आजाराची लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी न फिरता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्याची कोरोना स्थिती

आतापर्यंतचे एकूण रूग्ण - ३ लाख ९८ हजार ६३७गेल्या दहा दिवसांतील रूग्णसंख्या - ५६एकूण तपासण्या - ४५ लाख ३५ हजार ३९बरे झालेले रूग्ण - ३ लाख ९१ हजार ३५९बरे होण्याचे प्रमाण - ९८ टक्के एकूण मयत - ७ हजार २३४

लसीकरण आढावा

पहिला डोस - ३४ लाख २० हजार ७७२ (८५.५८ टक्के)दुसरा डोस - २७ लाख १७ हजार ८५० (६८ टक्के)बूस्टर डोस - २ लाख ५० हजार ८९ (३६.८४ टक्के)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस