शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कोपर्डी घडू नये ; नीलम गो-हे यांनी कुळधरण येथे मुलींशी साधला सवांद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:07 IST

भविष्यात कोपर्डी, कोठेवाडीसारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात कोपर्डी येथून केली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलमताई गो-हे यांनी दिली.

कर्जत : भविष्यात कोपर्डी, कोठेवाडीसारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात कोपर्डी येथून केली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार निलमताई गो-हे यांनी दिली.शनिवारी गो-हे यांनी कोपर्डी येथे पीडित कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रोजेक्टर व संगणक भेट दिला. यावेळी सरपंच रोहिनी सुर्यभान सुद्रिक, लालासाहेब सुद्रिक आदी उपस्थित होते. गो-हे यांनी सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच कुळधरण येथील नुतन मराठी विद्यालयात विद्याथीनींशी संवाद साधला. यावेळी गो-हे म्हणाल्या, सुरक्षित व निर्भयपणे जीवन जगण्यासाठी मुलींमध्ये धाडस तयार होणे गरजेचे आहे. यासाठी मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुली व मुलांसाठी व्यायामशाळा देणार आहे. यासाठी एक लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कोपर्डी येथील छकुलीच्या नावाने वाचनालय सुरू करणार आहे. यासाठी पन्नास हजार रुपयांचा निधी मंजूर केला. भविष्यात कोपर्डी व कोठेवाडी सारख्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात समुपदेशन शिबिर शिवसेना सुरू करणार आहे. याचा शुभारंभ कोपर्डी येथे करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक यांना सामावून घेतले जाणार आहे, असे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते बापूसाहेब गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, कर्जत शहरप्रमुख गणेश क्षीरसागर, मुख्याध्यापक सुर्यभान सुद्रिक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, बिभीषण खोसे आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी कर्जत येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. पुस्तके भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याध्यापक युसूफ शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर