शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

संगमनेरमधील कुंभारवाडीत दोन गटात वाद : ९ मोटारसायकल जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:39 IST

पळून जावून विवाह केलेल्या चुलत बहिणीला जत्रेसाठी बोलविल्याने दोन गटात झालेल्या वादातून नऊ मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या.

आश्वी : पळून जावून विवाह केलेल्या चुलत बहिणीला जत्रेसाठी बोलविल्याने दोन गटात झालेल्या वादातून नऊ मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी गावात सोमवारी घडली. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन तक्रारीवरून चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कुंभारवाडी येथे सोमवारी यात्रौत्सव होता. त्यावेळी राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील अरूण वारे हे पत्नीसह या यात्रौत्सवासाठी आले होते. यावेळी त्याच्या पत्नीचा चुलत भाऊ नामदेव काशिनाथ केदार याने वारे याची सासू फुलाबाई यांना मुलगी व जावई या दोघांना यात्रेसाठी का बोलावले? अशी विचारणा करत त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर वारे याने त्याच्या नातेवाईकांना तेथे बोलावून घेतल्यानंतर दोन गटात वाद होवून हाणामारी झाली. यावेळी वारे याचे नातेवाईक घेवून आलेल्या मोटारसायकली तेथेच सोडून पळून गेले. त्यानंतर नामदेव केदार व इतरांनी त्या नऊ मोटारसायकली पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अरूण महादू वारे व नामदेव काशिनाथ केदार या दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर