कोरडे यांचा विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाल्यानंतर एकरूखे व रांजणगाव खुर्द येथील ग्रामस्थ व नातेवाईकांनी शनिवारी गावात बंद पाळण्यात आला. नातेवाईकांनी रुग्णवाहिकेत मृतदेह आणून राहाता येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर रूग्णवाहिकेत ठेवत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. मयताच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, तसेच आर्थिक नुकसान भरपाई द्यावी व सुनील यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली होती त्याकरिता नातेवाईक व ग्रामस्थांनी ठिय्या सुरू ठेवला होता.
...............
वीज वितरण कंपनीचे राहाता येथील उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील यांनी बाह्यस्त्रोत एजन्सीच्या निष्कर्षाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करू. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांकडून स्वखुशीने आर्थिक मदत देऊ. अनुकंपातत्त्ववर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.