शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जूनचे वीजबिल पाहून ग्राहकांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:43 IST

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे महावितरणने ग्राहकांना घरपोहच बिले दिली नाहीत, त्यामुळे ग्राहकांनीही ती भरली नाहीत, त्यात उन्हाळ्याचे दिवस व लॉकडाऊन असल्याने वीजवापरही आपोआप वाढला. या सर्वांचा परिणाम आता जूनमध्ये दिसत असून मार्च, एप्रिल व मे असे तीन महिन्यांचे भरगच्च बिल हातात पडल्याने ग्राहकांना जोरदार ‘शॉक’ बसला आहे. दरम्यान, या तीन महिन्यांत जिल्ह्यात घरगुती ग्राहकांचे १६० कोटी रूपये थकले आहेत. 

चंद्रकांत शेळके । 

अहमदनगर : लॉकडाऊनमुळे महावितरणने ग्राहकांना घरपोहच बिले दिली नाहीत, त्यामुळे ग्राहकांनीही ती भरली नाहीत, त्यात उन्हाळ्याचे दिवस व लॉकडाऊन असल्याने वीजवापरही आपोआप वाढला. या सर्वांचा परिणाम आता जूनमध्ये दिसत असून मार्च, एप्रिल व मे असे तीन महिन्यांचे भरगच्च बिल हातात पडल्याने ग्राहकांना जोरदार ‘शॉक’ बसला आहे. दरम्यान, या तीन महिन्यांत जिल्ह्यात घरगुती ग्राहकांचे १६० कोटी रूपये थकले आहेत. 

लॉकडाऊनमध्ये सर्वच यंत्रणा ठप्प होत्या. सुरक्षिततेची बाब म्हणून या काळात महावितरणने वीजबिलांचे घरोघरी वाटप केले नाही. शिवाय मीटर रिडिंग घेण्यासाठीही कर्मचारी घरोघरी पाठवले नाहीत. या काळातील बिले आॅनलाईन पाठवण्यावर महावितरणने भर दिला. ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी महावितरणकडे आहेत, त्यांना बिले पाठवण्याचा प्रयत्न झाला. तसे आवाहनही महावितरणने केले होते. परंतु त्यास ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. परिणामी वसुली केवळ १५ ते २५ टक्क््यांवरच थांबली. याशिवाय लॉकडाऊनमध्ये विजेचा घरगुती वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. मार्च, एप्रिल व मे अशी तीनही महिने कडक उन्हाळ्याची असल्याने वातानुकूलित यंत्रणा, पंखा, कुलर, फ्रिज, तसेच इतर घरगुती उपकरणांचा वापरही आपसूकच वाढला. त्याचा एकत्रित परिणाम ग्राहकांची या तीनही महिन्यांतील बिले फुगली. 

महावितरणने रिडिंगच घेतले नसल्याने या तीनही महिन्यांत आधीच्या वापरावर सरासरी बिले तयार करण्यात आली. परंतु लॉकडाऊन असल्यानेही ही बिले ग्राहकांच्या घरापर्यंतच पोहोचली नाहीत. महावितरणने आॅनलाईन बिले देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मर्यादा आल्या. त्यातही ज्यांना आॅनलाईन बिले मिळाली त्यांनीही बिल भरण्याकडे कानाडोळा केला. महावितरणने जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या महिन्यात अनुक्रमे सुमारे ६०, ५४ व ६४ कोटींची बिले दिली. त्याची वसुली १०० टक्के झाली. परंतु लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांत अनुक्रमे ६४, ६६ व ६६ अशी १९६ कोटींची बिले तयार झाली. त्या तुलनेत या तीन महिन्यांत केवळ ३७ कोटीची वसुली झाली. म्हणजे तब्बल १५९ कोटींची थकबाकी ग्राहकांकडे राहिली. ती थकबाकी आता जूनच्या महिन्यात एकत्रित आल्याने जूनचे बिल तिप्पट वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये आता महावितरणच्या या शॉकने ग्राहक घायाळ झाले आहेत.