शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

राज्यात भगवानबाबांची १११ मंदिरे बांधणार

By admin | Updated: April 15, 2016 23:21 IST

अहमदनगर : चांगल्या कामाची सुरूवात भगवान बाबांच्या आशीर्वादाने करायची हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा संदेश राज्यभर पोहचवण्याचा संकल्प जय भगवानबाबा महासंघाने घेतला आहे.

बाळासाहेब सानप : शहापूर येथे बाबांच्या मंदिराचे भूमिपूजनअहमदनगर : चांगल्या कामाची सुरूवात भगवान बाबांच्या आशीर्वादाने करायची हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा संदेश राज्यभर पोहचवण्याचा संकल्प जय भगवानबाबा महासंघाने घेतला आहे. यासाठी राज्यात बाबांची १११ मंदिरे बांधण्यात येणार असून आतापर्यंत ३८ मंदिरांची उभारणी झालेली आहे. तालुक्यातील शहापूर येथे ३९ व्या मंदिराच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हभप रामगिरी महाराज, हभप दत्त दिगंबर महाराज, महासंघाचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, उद्योजक बाबूशेठ नागरगोजे, सरपंच सुधीर पोटे, सरपंच प्रकाश पालवे, संदीप ढाकणे, सदाशिव थोरे, श्याम बडे, प्रदीप घोडके, बाबा सानप आदी उपस्थित होते. सानप म्हणाले की, जिल्ह्यात महासंघाचे काम भिमराज आव्हाड यांच्यावर सोपवले असल्याने ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील. समाजातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महासंघ स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहापूर येथील मंदिराच्या कामासाठी स्वत:चे १ लाख ११ हजार १११ रुपये देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मंदिरातील बाबांच्या मूर्तीसाठी नागरगोजे योगदान देणार आहेत. शहापूरचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव काळे यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट देण्याचा संकल्प केला असल्याचे सानप यांनी यावेळी जाहीर केले. मंदिरासाठी जागा नसल्याने श्याम बडे यांनी स्वत:चे राहते घर पाडून मंदिरासाठी जागा दिली. यावेळी गिरिजा गुट्टे, पोटे, नागरगोजे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला सोमेश्वर आव्हाड, गुड्डी उबाळे, शहादेव दहिफळे, सतीश पालवे, बापू चव्हाण, गुलाब पालवे, कृष्णा बेरड, भास्कर पालवे, बाळासाहेब पालवे, अमोल गायकवाड, मच्छिंद्र पालवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)