शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

काँग्रेसला मोदी लाटेचा धसका

By admin | Updated: June 12, 2014 00:10 IST

मतविभागणी पथ्यावर : महायुतीचे कडवे आव्हान

मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूरशिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना सर्वाधिक १ लाखांहून अधिक मते देणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात सत्ताधारी काँग्रेससमोर महायुतीने कडवे आव्हान आहे.काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे या मतदार संघाचे प्रथमच प्रतिनिधीत्व करीत आहेत. २००९ पासून हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होऊन राहुरीच्या देवळाली जि. प. गटातील ३२ गावेही यात समाविष्ट झाली. यापूर्वी काँग्रेसकडून जयंत ससाणे सलग दोनदा निवडून आले आहेत. कांबळेंच्या रूपाने राखीव प्रवर्गातील व्यक्ती जरी श्रीरामपूरची आमदार असली तरी सारी सूत्रे ससाणेंच्याच हाती आहेत. श्रीरामपूर शहरावरील पकड तसेच १० वर्षांच्या आमदारकीच्या काळात ग्रामीणमध्ये निर्माण केलेल्या फळीच्या जोरावर तालुका काँग्रेसमय ठेवण्यात ससाणे यशस्वी ठरले. कांबळे आता पुन्हा इच्छूक आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला येथून ५० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यास धक्का बसला. काँग्रेसकडे सध्या तरी कांबळेच प्रबळ दावेदार आहेत. ससाणेंचे स्वीय सहायक सुभाष तोरणेही तयारीत आहेत. तर महायुतीकडे लहू कानडे व भाऊसाहेब डोळस इच्छूक आहेत. राष्ट्रवादीचे नेते भानुदास मुरकुटे माजी सभापती सुनीता गायकवाड यांना शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यास महायुतीमध्ये विरोध आहे. सेनेची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवार उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘आप’ कोणालाही आपली वाटत नाही. स्वाभीमानी शेतकरी संघटना आंदोलनापुरती दिसते. रिपाइंचे अस्तित्व असले तरी गटतटात विखुरल्याने त्यांचा इतरांनाच फायदा होतो. त्यांच्याकडेही भक्कम उमेदवार नाही. सर्वाधिक मतदार असलेल्या श्रीरामपूर शहरावर ससाणेंची पकड आहे. महायुतीस पोषक वातावरण असले तरी भाजपही शिवसेनेच्या या जागेवर हक्क सांगू लागला आहे.नेत्यांविषयीच साशंकता राष्ट्रवादीचे भानुदास मुरकुटे भाजपच्या तिकिटावर नेवाशातून, काँग्रेसचे ससाणे शिर्डीतून, भाजपचे प्रकाश चित्ते नेवाशातून लढण्याच्या तयारीत आहेत. चित्ते सोडल्यास मुरकुटे-ससाणे काँग्रेस सोडून महायुतीत जाण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेत्यांविषयीच साशंकता आहे.मतविभागणीवर कांबळे आमदारगेल्या निवडणुकीत युतीचे भाऊसाहेब डोळस व मुरकुटेंचे अपक्ष विजय शिंदे, रिपाइंचे राजाभाऊ कापसे यांच्यातील मतविभागणीमुळे काँग्रेसचे कांबळे आमदार झाले. आता मतविभागणी टळली तरच महायुतीस संधी मिळेल, अन्यथा काँग्रेससाठी यशाचा मार्ग अधिक सुकर होईल, अशी शक्यता आहे.काँग्रेसभाऊसाहेब कांबळे५९८१९शिवसेनाभाऊसाहेब डोळस३८९२२अपक्षविजय शिंदे२०२३७इच्छुकांचे नावपक्षभाऊसाहेब कांबळेकाँग्रेससुभाष तोरणेकाँग्रेसलहू कानडेशिवसेनासुनीता गायकवाडशिवसेनालोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५२ हजारांचे मताधिक्य