याप्रसंगी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, ज्येष्ठ नेते दिलीप कोते, राजेंद्र गायके, युवकचे प्रदेश सचिव प्रसाद शेळके, रमेश शेळके, दीपक कोते, जिल्हा सरचिटणीस उमेश शेजवळ, युवकचे शहराध्यक्ष अमृत गायके, युवकचे शहर सरचिटणीस सागर परदेशी आदी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा ७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने राज्यभर १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस बळकटीकरण सप्ताह दरम्यान विविध समाजहिताचे उपक्रम राबविले जात असल्याने युवकचे शहराध्यक्ष अमृत गायके यांनी सांगितले. यावेळी कृष्णा गायके, अनिल आसने, मदन मोकाटे, स्वराज त्रिभुवन, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, बाबासाहेब गवारे, सागर शिंदे, अभिजित शिंदे, रवींद्र इचके, लुकास आडांगळे आदी उपस्थित होते.
शिर्डीत काँग्रेस बळकटीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST