कोपरगाव : कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीने राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजता कोपरगाव येथील समता सभागृहात संवाद मेळावा आयोजित केला आहे.
हा मेळावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे, जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस मीनल खांबेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या मेळाव्यात संघटनात्मक बाबी, रणनीती, कार्यकर्ता प्रशिक्षण तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन तथा संवाद होणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे तसेच शहराध्यक्ष सुनील साळुंके यांनी दिली. या कार्यक्रमानंतर कोपरगाव महिला काँग्रेस कमिटीकडून हळदी - कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ॲड. शीतल देशमुख, शहराध्यक्षा रेखाताई जगताप यांनी दिली. या संवाद मेळाव्याला काँग्रेस विचारधारेला मानणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
-----------