लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळा परिसरातील जाहिरातींचे अनधिकृत फलक बुलडोझरच्या सहाय्याने हटविण्याचा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गुरुवारी दिला.
नेहरू पुतळा परिसरातील जाहिरातींचे फलक हटविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत ठिय्या दिला. यावेळी काळे म्हणाले की, मनपा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. जातीयवादी भाजपची महापालिकेत सत्ता आहे. यामुळेच हा सर्व प्रकार सुरू आहे. सत्तेत स्थानिक राष्ट्रवादी भागीदार आहे. त्यांनीदेखील याबाबतीत काही भूमिका घेऊ नये, ही काँग्रेससाठी खेदाची बाब आहे. पंडित नेहरू हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. नेहरू यांच्या पुतळा परिसराची महापालिकेच्या गलथान कारभाराची दैनावस्था झाली आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नागरिक हवालदिल झालेले आहेत. पंडित नेहरू यांचा पुतळा आणि परिसराची दैनावस्था करून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावण्याचे पाप जाणीवपूर्वक केले जात असल्याचे काळे म्हणाले. यावेळी फारुख शेख, खलिल सय्यद, चिरंजीव गाढवे, ॲड. अक्षय कुलट, डॉ. मनोज लोंढे, अज्जूभाई शेख, सुजित जगताप, नाथा आल्हाट, अनंतराव गारदे, कौसर खान, नीता बर्वे, प्रवीण गीते, चेतन रोहोकले, डॉ. रिजवान शेख, प्रमोद अबुज, अमित भांड, अजित वाडेकर, शरीफ सय्यद, विकी करोलिया, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
..
सूचना फोटो काँग्रेसे नावाने आहे.