शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन् आयोग लागू करावा; दशरथ सावंत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 13:36 IST

राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली आहे. या आयोगावर चर्चा करुन प्रस्ताव ठेवून त्यास मान्यता द्यावी, अशी मागणीही रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी केली.

अकोले : राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली आहे. या आयोगावर चर्चा करुन प्रस्ताव ठेवून त्यास मान्यता द्यावी, अशी मागणीही रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी केली आहे.

 काँग्रेस-राष्ट्रवादी या महाआघाडी सरकारमधील दोन पक्षांनी नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्याची भूमिका जाहीरपणे व्यक्त केली आहे. याबाबतीत या दोन्ही पक्षांनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. परंतु देशात व महाराष्ट्रात काँगेस राष्ट्रवादी आघाडी सरकारचे राज्य असतानाच्या काळातच स्वामिनाथन् आयोगाचा अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सुद्धा तो आघाडीच्या केंद्र व राज्य सरकार यापैकी कोणीही लोकसभेच्या व विधानसभेच्या पटलावर ठेऊन तो लागू करण्याची कृती सोडाच, परंतु त्यावर या दोन्ही सभागृहांतून चर्चा घडून आणण्याचे सुद्धा काम केले नाही. त्यामुळे देशभर शेतकरी या कायद्याच्या विरोधात असंतोष व्यक्त करतात. या कायद्याला विरोध असल्याची काँगेस व राष्ट्रवादीची भूमिका केवळ नाटकी स्वरूपाची व शेतकºयांची फुकटची सहानुभूती मिळवण्याच्या राजकीय स्वार्थासाठी नसून शेतकºयांच्या खºयाखुºया प्रेमापोटी आहे. हे सिध्द करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने या प्रश्नावर त्वरित विधानसभेचे खास अधिवेशन बोलावावे. स्वामिनाथन आयोग विधानसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवावा. चर्चेनंतर ह्या आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन त्याला विधानसभेने मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करावा, असेही सावंत यांनी म्हटले आहे. ...तर ठपका ठेवून सरकार पाडावेमहाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाने त्याला विरोध केला तर त्याच्यावर ठपका ठेऊन सरकार पाडावे. असे केले तरच तुम्हाला शेतकºयांबद्दल खरे प्रेम आहे हे सिध्द होईल. अन्यथा राजकारणासाठी केलेली ती केवळ नौटंकी ठरेल. शेतकरी हिताच्या कसोटीवर उतरण्याची ही या दोन्ही पक्षांना मिळालेली संधी समजून हे पक्ष तसे वागतात की नाही यावर शेतकºयांबाबतच्या त्यांच्या भूमिकेचे मूल्यमापन ठरणार आहे, असेही दशरथ सावंत यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेAgriculture Sectorशेती क्षेत्रPoliticsराजकारण