शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडे प्रचाराचा मुद्दाच नाही-भाऊसाहेब कांबळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:28 IST

गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.

श्रीरामपूर : गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.श्रीरामपूर शहरातील नगरसेवक शामलिंग शिंदे, जयश्री शेळके,राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, स्नेहल खोरे या नगरसेवकांच्या प्रभागात झालेल्या चौक सभेत कांबळे बोलत होते. यावेळी मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडधे, डॉ. महेश क्षीरसागर, अशोक थोरे, अरुण पाटील, निखिल पवार, अक्षय वर्पे, विशाल यादव, रमेश घुले, संजय पाटील, अ‍ॅड.अरुण लबडे उपस्थित होते.कांबळे म्हणाले, विरोधकांच्या गटात होतो तेव्हा आपण चाललो. मात्र त्यांची साथ सोडल्याने माझ्या शिक्षणाचा साक्षात्कार झाला. विरोधकांकडे विधायक व विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते आता वैैयक्तिक टीका करत आहेत. ज्यांची हयात सनदी अधिकारी म्हणून गेली. ज्यांचा समाजकारणाशी व जनतेशी दुरान्वये संबंध नाही. ते काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांना इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण गेली पंचवीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात आहोत. काँग्रेसच्या उमेदवाराकडे कोणतेही मुद्दे वा विकासाचा कार्यक्रम नाही. माझ्याकडे श्रीरामपूरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे, असे कानडे म्हणतात.मग त्यांनी ती आताच जनतेसमोर मांडावी.मी स्व. जयंत ससाणे यांच्याशी गद्दारी केलेली नाही. ससाणेंच्या अवतीभवती कोंडाळे करणा-या कंपूने मला बाहेरचा रस्ता दाखवला. आता तेच मी गद्दारी केल्याचे म्हणत आहेत. कानडे यांनी स्वत: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व शिवसेना अशा दोन ठिकाणी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. तिकीट मिळत नाही, असे स्पष्ट होताच शिवसेनेतून उडी मारुन काँग्रेसच्या डेरेदाखल झाले.  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019