शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जनसंघर्षवरून संगमनेरात विद्यार्थी संघटनांची जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:24 IST

कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला.

ठळक मुद्देसभेला उपस्थित राहण्याची सक्ती अभविपचा आरोप : एनएसयुआयकडून खंडन

संगमनेर : कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला. मात्र, असे काहीही झाले नसून विद्यार्थी स्वयंस्फूतीर्ने कॉँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाल्याचे एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा म्हणाले.अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका वर्गाच्या व्हॉटसअप समुहावर एक प्राध्यापक विद्यार्थ्यांना कॉलेजची नियोजित पुर्वपरीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना बिना गणवेश आणि ओळखपत्र एका राजकीय पक्षाच्या सभेत सहभागी व्हायच्या सुचना देतो. म्हणजे शैक्षणिक वेळापत्रकात राजकारणासाठी ढवळाढवळ करून विद्यार्थ्यांचे नुकसान करायचं आणि बाता शैक्षणिक प्रश्नांच्या करायचा. शिक्षणाच्या मंदिरातच यांनी राजकीय स्वाथार्चा धंदा उघडणाऱ्या अन स्वत:चा राजकीय स्वार्थ साधाणाºया पोरांच्या परीक्षांचा बळी देणाºयांना लाज वाटली पाहिजे. असा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला.यावर प्रतिक्रिया देताना एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पापडेजा म्हणाले, जनसंघर्ष यात्रा ही सामाजातील सर्व घटकांसाठी आहे. तशीच ती विद्यार्थ्यांसाठीही आहे. तालुक्यातील सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी एनएसयुआयच्या वतीने आव्हान करण्यात आले होते. अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना सक्ती केली हा खोडसळपणा आहे. एक प्रकारे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विद्यार्थी हिताचा एकही निर्णय भाजप सरकारने घेतलेला नाही. आणि आता ते विद्यार्थी प्रेमाचा खोटा आव आणत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर