शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी पदाधिकाऱ्याच्या बदलीवरून गोंधळ

By admin | Updated: July 26, 2016 23:49 IST

अहमदनगर : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव डी. जी. अकोलकर यांची झालेली बदली रद्द करावी,

अहमदनगर : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव डी. जी. अकोलकर यांची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी मंगळवारी संघटनेच्या सभासदांनी विभागीय नियंत्रक कार्यालयात एकच गर्दी केली. ही बदली राजकीय दबावातून झाल्याचा आरोप सभासदांनी केला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही एकमेव मान्यताप्राप्त संघटना असून ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित काही संघटना राजकीय दबाव आणून मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करतात. परिवहन मंत्री शिवसेनेचे असून सेनेचीही एसटी संघटना आहे. मान्यताप्राप्त संघटनेची गळचेपी करून त्यांना त्यांची संघटना वाढवायची आहे, त्यामुळे ते आकसबुद्धीने पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. याशिवाय परिवहन मंत्र्यांचे एक चालक अहमदनगर विभागातील असून ते मंत्र्यांच्या मर्जीतील आहेत. त्यांच्या सांगण्यावरून जर परिवहनमंत्री बदली करत असतील तर ते दुर्दैवी आहे, असा आरोपही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.मंगळवारी दुपारी संघटनेचे जिल्हाभरातील शेकडो सभासद विभागीय नियंत्रक कार्यालयात जमा झाले. विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस यांच्यासह उत्तम रणसिंग, रोहिदास आडसूळ, अरुण दळवी, रजनी साळवे, संजय नलगे, दिलीप लबडे आदी निवडक पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक अशोक जाधव यांच्याशी चर्चा करून बदली रद्द करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)