शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:02 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा संवर्ग असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शुक्रवारी गोंधळ झाला.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा संवर्ग असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शुक्रवारी गोंधळ झाला. तालुकास्तरावरून बदली पात्र शिक्षकांच्या अद्ययावत याद्या न आल्याने दिवसभरात केवळ मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या. ही प्रक्रिया रात्री आठपर्यंत सुरू होती. दरम्यान, माहिती अद्ययावत न ठेवणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागातील आणि तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. ८ हजार ५०० प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. यात बदली पात्र शिक्षकांची यादी तयार करणे, आदिवासी भागात बदलून जाणारे शिक्षक, आदिवासी भागातून बाहेर बदलून येणारे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची तालुकानिहाय अद्ययावत याद्या तयार करण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागाकडून ंिबनचूक झाले नाही. यामुळे तालुकानिहाय शिक्षकांचे समानीकरण करताना अडचणी निर्माण झाल्या. विशेषकरून राहाता, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्याची माहिती अद्ययावत नव्हती. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे संतप्त झाले.सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मुख्याध्यापकांच्या समानीकरणाची प्रक्रिया दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत रखडली. या तीन तालुक्यांची माहिती अद्ययावत झाल्यावर समानीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, दुपारी १ वाजता बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला तालुकानिहाय रिक्त असणाऱ्या जागांचा तपशील घेण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्षात २ वाजता मुख्याध्यापकांच्या पेसांतर्गत बदल्या सुरू झाल्या. पेसातून बाहेर येण्यास बहुतांशी मुख्याध्यापकांनी नकार दिला. (प्रतिनिधी)प्राथमिक शिक्षण विभागातील बदल्यांमुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आवारात शिक्षकांची तोबा गर्दी होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहाबाहेर शिक्षकांच्या ठिय्यामुळे चालणे मुश्किल झाले होते. प्रशासनाने बदली पात्र शिक्षकांना नगरला बोलवावे, आपसी बदली प्रक्रिया पत्राद्वारे करण्यात यावी, अशी भावना काही शिक्षकांनी बोलून दाखवली. शिक्षक नेते बदली प्रक्रियेच्यावेळी सभागृहात ठाण मांडून होते. शुक्रवारी पेसातून विनंती बदली १, पेसातून बाहेर १ आणि रिक्त असणाऱ्या जागेवर १ अशा ३ बदल्या झाल्या. तर शेवगाव १०, पाथर्डी ७, जामखेड २ आणि नेवासा ६ अशा २४ बदल्या समानीकरणात झाल्या. आज उपाध्यापक यांच्या बदल्या होणार आहेत. पदवीधर शिक्षकांच्या बदल्या सोमवारी होणार आहेत.बदली प्रक्रिया सुरू असताना पेसातून बाहेर येण्यास नकार देणाऱ्या मुख्याध्यापकांच्या सह्या कोऱ्या कागदावर येत असल्याचे पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी ंिबनवडे संतप्त झाले. या शिक्षकांची प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची का? असे सवाल करत रजिष्टरमध्ये नाव नोंदवा. संगणक चालवता येत नाही, नोकऱ्या कशाला करता, असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले.