शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 23:51 IST

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलक व मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगररोड, दिल्ली नाका, जोर्वे नाका, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली. या कारवाईमुळे नवीननगर रोडवरील अतिक्रमणधारक रस्त्यावर आले. हातगाडी व टपऱ्यांमधील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या टपरीधारकांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता नगरपरिषदेत जाऊन मासिक सभा सुरू असताना रामकृष्णदास महाराज सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक कैलास वाकचौरे, जावेद जहागीरदार, किशोर पवार, ज्ञानेश्वर कर्पे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांनी बाहेर येऊन चर्चा केली. आंदोलकांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर पडण्यास मज्जाव करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वांनी प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसकन मांडून ठिय्या दिला. सचिन साळुंके व दीपक साळुंके यांनी आंदोलकांची भूमिका मांडली. पालिकेने नवीन नगररोडवरील भास्करराव दुर्वे शॉपींग सेंटरमधील गाळेधारकांचे नूतनीकरण गेल्या ९ वर्षांपासून केले नसल्याचा आरोप केला. अशा बेकायदा ३४ गाळेधारकांवर कारवाई करून ते भाडेतत्वावर आम्हाला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कुरे व साळुंके यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तांबे यांनी समजूत घालत मागण्यांसंदर्भात ठराव करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक पायऱ्यांवर ठाण मांडून होते. आंदोलनात कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबुराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी सहकुटुंब सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नगरपरिषद मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्याकरिता आधी ठराव होतो, मग निविदा काढून लिलाव घेतले जातात. याला काही काळ जावू द्यावा लागेल. एकाएकी कुठलाही निर्णय होत नसतो. -डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्याधिकारी