शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:28 IST

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी ( दि.२७) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गोडवूनमध्ये युरिया, कापूस, सोयाबीन, गहू, मका यांचा मोठा साठा होता. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.

संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी ( दि.२७) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गोडवूनमध्ये युरिया, कापूस, सोयाबीन, गहू, मका यांचा मोठा साठा होता. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती. महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच संगमनेर नगरपरिषद, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बाजार समितीच्या आवारात दाखल झाल्या होत्या. आगीने रौद्ररूप धारण केले होते. गोडाऊनच्या चारही बाजूंनी पाण्याच्या मारा करण्यात येत होता. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. घटनेची माहिती मिळताच संगमनेर तहसीलदार अमोल निकम, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे, सामाजिक कार्यकर्ते भूपेश भळगट, सोमनाथ मुर्तडक हे घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी बाजार समितीत मोठी गर्दी केली होती. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. आग वाढतच होती. रात्री साडे दहानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. त्यामुळे अकोले, राहुरी, सिन्नर, प्रवरानगर येथील अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने भिंत तोडून पाण्याचा फवारा मारण्यात आला. रात्री उशीरापर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती. या आगीत नेमके किती नुकसान झाले, हे आग पूर्ण विझल्याशिवाय समजू शकणार नाही. मात्र, या गोडाऊनमध्ये लाखो रुपये किमतीचा साठा असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर