शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भावीनिमगावात संपूर्ण लॉकडाऊन,कोरोनाबाधित बसचालकाने येथेही राखले प्रसंगावधान, भेटण्यासाठी गेलेल्यांनी वाढवली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:33 IST

दहिगावने  : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे दि१३ रोजी आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल दि.१६ रोजी पॉसिटीव्ह आल्याने गाव २९ जूनपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

दहिगावने  : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे दि१३ रोजी आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल दि.१६ रोजी पॉसिटीव्ह आल्याने गाव २९ जूनपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या असून गावात ये-जा करण्यास बंदी घातली आहे. वैद्यकीय पथकाद्वारे गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सदर कोरोनाबाधित व्यक्ती एसटी बस चालक आहे. कायम प्रसंगावधान राखणाऱ्या या चालकाने येथेही प्रसंगावधान राखत थेट विलगीकरण कक्ष गाठला होता.

 

मात्र त्यांना अगोदरच पोटाचा त्रास असल्याने येथून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाताना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोघांनी प्रवास केला. शिवाय एकजण त्यांना भेटण्यासाठी गेला. तिघे जण नगरहून पुन्हा गावातील विलगीकरण कक्षात दाखल झाले असा अहवाल दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कैलास कानडे व डॉ सुमित श्रावणे यांनी तहसीलदार यांना दिला. त्यामुळे दि१७ रोजी या तिघांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे गाव संपूर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.

या काळात शेवगाव पोलीस स्टेशनचा एकही कर्मचारी गावाकडे फिरकला नाही अशी माहिती आपत्तीव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तहसीलदारांना दिली. त्यानंतर तहसीलदारांनी फोनवर तात्काळ संपर्क करत बंदोबस्त देण्याचे सांगितले.

फोटो - भावीनिमगाव ता शेवगाव येथे भेट देत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी आपत्तीव्यवस्थापन समितीला मार्गदर्शक सूचना दिल्या.-----------------