शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये धनशक्ती विरोधात सर्वसामान्य लढत : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:08 IST

लोकसभा निवडणुकीत विरोधक सर्व शक्तीचा वापर करतील, मात्र आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू. ही लढाई धनशक्तीविरोधात सर्वसामान्यांची असेल.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत विरोधक सर्व शक्तीचा वापर करतील, मात्र आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू. ही लढाई धनशक्तीविरोधात सर्वसामान्यांची असेल. अहमदनगरमध्ये १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.नगर येथील कार्यकर्त्यांशी पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.पवार म्हणाले, देशाचे व राज्याचे लक्ष अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. पुर्वी एकदा अशीच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी यशवंतराव गडाख यांना काँग्रेसकडून उमेदवारी देत निवडून आणले. यावेळी तिकिटाची मागणी केली. काहींनी बाहेरचा माणूस घ्यावा, अशा मागण्या केल्या. पण आपल्याकडे त्याच्यापेक्षा चांगले उमेदवार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. त्यांनी दोन्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली. आता त्यांनी तिसरा पर्याय निवडला आहे. आपली लढाई भाजप-सेनेविरोधात आहे. शिवसेना भाजपाला किती साथ देते हे आपल्याला माहित आहेच. विरोधातील उमेदवार अदृश्य शक्तीचांही वापर करू शकतात. त्याविरोधात आपल्याला एकसंघपणे लढाई द्यायची आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर