शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन काळात स्वच्छतेचे पारायण, विद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:31 IST

श्रीगोंदा : दोन महिने कन्याकुमारीत अडकलेल्या दत्तभक्तांनी हंगेवाडीत (ता. श्रीगोंदा) आल्यानंतर हंगेश्वर विद्यालयात क्वारंटाईन काळात स्वच्छतेचे पारायण सुरू केले आहे. येथील विविध कामे करून विद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

बाळासाहेब काकडे  श्रीगोंदा : दोन महिने कन्याकुमारीत अडकलेल्या दत्तभक्तांनी हंगेवाडीत (ता. श्रीगोंदा) आल्यानंतर हंगेश्वर विद्यालयात क्वारंटाईन काळात स्वच्छतेचे पारायण सुरू केले आहे. येथील विविध कामे करून विद्यालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.हंगेवाडीतील दत्तभक्त तुकाराम हंडगर, लक्ष्मीकांत अवघडे, रख्माजी प्रभू रायकर यांनी दर्या बापू काळे, श्रीरंग धायगुडे, राहुल रायकर, शिवाजी डोमाळे, रोहिदास घोडके हे ११ मार्च रोजी दत्त पारायण करण्यासाठी कन्याकुमारीला गेले होते. लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते तिथेच अडकले. या काळातही त्यांनी विविध ग्रंथांची सात पारायणे केली.राहुरीचे सुपुत्र प्रशांत वडनेरकर हे कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी आहेत. लॉकडाऊन शिथिल होताच प्रशांत वडनेरकर यांनी या दत्त भक्तांना गावी पाठविण्यासाठी मदत केली ते खासगी वाहनातून हंगेवाडीला परतले. हंगेवाडीच्या कोविड १९ ग्राम सुरक्षा समितीने या आठ जणांना हंगेश्वर विद्यालयात क्वारंटाइन केले. तेथेही ते स्वस्थ बसले नाहीत. सुरुवातीला इमारत सफाईनंतर शौचालयाची स्वच्छता केली. विद्यालयाचा बाहेरील परिसर स्वच्छ करून घेतला. झाडांना वाफे बनविले आणि नवीन झाडे लावण्यासाठी खड्डे खोदले आहेत. यामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.या कामासाठी त्यांना सरपंच सोनाली संतोष रायकर, ग्रामविकास अधिकारी राजू विधाते, आरोग्य सेवक आर. आर. गायकवाड, आरोग्यसेविका निर्मला चौधरी, मुख्याध्यापक अरूण रायकर यांनी मदत केली. क्वारंटाइन काळात हंगेश्वर विद्यालयात स्वच्छतेचे पारायण सुरू झाले. यामध्ये विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. --- हंगेवाडीकरांची दक्षता..हंगेवाडी परिसरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी हंगेवाडीकरांनी सुरुवातीपासून दक्षता घेतली. पुणे, मुंबई येथून येणाºया पळवाटांवर पहारेकरी ठेवले आहेत. गावातील मच्छीबाजार बंद केला. इतर दुकाने कमी काळासाठी उघडी ठेवण्याचे धोरण घेतले. संतोषराव रायकर यांनी वाशीम, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार मजुरांना घरपोहोच करण्यासाठी वाहने दिली. त्यासाठी तहसीलदार महेंद्र महाजन यांनीही मोठी मदत केली.