शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

बदली आदेश नसताना आयुक्तांनी सोडला पदभार

By admin | Updated: May 11, 2016 23:58 IST

संदीप रोडे, अहमदनगर अहमदनगर महापालिकेचे आयुक्त विलास ढगे यांची बदली झाली नसल्याचे शासन दप्तरी दिसत असून बदली झालेली नसताना त्यांनी पद्भार सोडलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

संदीप रोडे, अहमदनगरअहमदनगर महापालिकेचे आयुक्त विलास ढगे यांची बदली झाली नसल्याचे शासन दप्तरी दिसत असून बदली झालेली नसताना त्यांनी पद्भार सोडलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नव्याने नियुक्त झालेले दिलीप गावडे यांनी महापालिका आयुक्त पदाचा घेतलेला पद्भार म्हणजे शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व नगरविकास विभागात समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विजय कुलकर्णी यांची १३ जुलै २०१५ रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात बदली झाली. त्यानंतर सोलापूर येथे अतिरिक्त आयुक्त असलेले विलास ढगे यांची कुलकर्णी यांच्या जागी २१ जुलै २०१५ मध्ये अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. ढगे यांनी गत महिन्यातच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाकडे सादर केला आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही आणि त्यांचा वर्षभराचा कालावधीही नगरमध्ये पूर्ण झालेला नाही. विलास ढगे यांच्या बदलीबाबत कोणताच आदेश अहमदनगर महापालिकेला आजतागायत प्राप्त झालेला नाही. ढगे यांनाही वैयक्तिक असा आदेश प्राप्त झालेला नाही. गोंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले दिलीप गावडे यांना २९ मार्च २०१६ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नतीने समाविष्ट करून घेण्यात आले. पदोन्नतीनंतर त्यांना अहमदनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून ४ मे २०१६ रोजीच्या आदेशाने नियुक्ती देण्यात आली. ड वर्ग अहमदनगर महापालिकेला प्रथमच भाप्रसे अधिकारी मिळाला. गावडे यांची अहमदनगरला बदली झाल्यानंतर त्यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडून पद्भार स्वीकारावा असे पत्र २७ एप्रिल २०१६ रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांनी काढले. हे पत्र अहमदनगर महापालिकेला प्राप्त झाले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव सरीता बांदेकर-देशमुख यांनी ६ मे २०१६ रोजी सुधारित पत्र काढून आयुक्त विलास ढगे यांच्याकडून गावडे यांनी पद्भार स्वीकारावा असे म्हटले. मात्र हा पत्रव्यवहार होत असताना किंवा बदली आदेश निघत असताना विलास ढगे यांची बदली झाल्याचे कोणतेच आदेश शासनाच्या नगरविकास विभागातून निघालेले नाहीत. मग बदली झाली नसताना ढगे यांनी आयुक्त पदाचा पद्भार सोडलाच कसा? असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी सेवा मंडळाची शिफारस नाहीसर्वोच्च न्यायालयाच्या २०११ मधील निर्देशानुसार मुख्याधिकारी व भाप्रसे संवर्गातील बदली करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणास शिफारस करण्यासाठी नागरी सेवा मंडळ शासनाने ९ एप्रिल २०१४ मध्ये स्थापन केले आहे. ढगे व गावडे यांचे बदली आदेश निघत असताना नागरी सेवा मंडळासमोर ते गेलेच नाहीत. त्यामुळेच हा घोळ निर्माण झाला असल्याचे प्राप्त माहितीवरून स्पष्ट होते.ढगे यांच्या बदलीबाबत नगरविकास विभागातून कोणतेही आदेश निघालेले नाहीत. सामान्य प्रशासन विभागाने ढगे यांच्या जागी आयुक्त म्हणून कोणातरी भाप्रसे अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याचा कोणताच अहवाल नगरविकास विभागाला प्राप्त झालेला नाही. विलास ढगे हे नियुक्ती मागण्याकरीता येतील. त्यानंतर पुढील निर्णय होईल. -ज. ना. पाटील,उपसचिव, नगरविकास विभागमुख्याधिकारी संवर्गातील बदल्या या नगरविकास विभागातून तर ‘भाप्रसे’च्या बदल्या या सामान्य प्रशासन विभागामार्फत केल्या जातात. नगरविकास व सामान्य प्रशासन विभागात समन्वय नसल्याने ढगे यांच्या बदलीचा घोळ झाला आहे. ढगे यांच्या बदलीबाबत कोणतेच आदेश मनपाला मिळालेले नाही. गावडे यांची बदली करताना शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. -शाकीर शेख