शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेमधील बाजारपेठा बंद ठेऊन संपास पाठींबा, माधव भंडारी यांच्या पुतळ््याचे दहन

By admin | Updated: June 1, 2017 14:57 IST

शेतकरी राज्यव्यापी बंदचे तीव्र पडसाद अकोले तालुक्यातही उमटला.

आॅनलाइन लोकमत अकोले(अहमदनगर) दि.१शेतकरी राज्यव्यापी बंदचे तीव्र पडसाद अकोले तालुक्यातही उमटला. कोतुळ परिसरातील गावातील शेतकरी एकत्र येऊन मुख्य चौकात दूध ओतले तर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पुतळ्यास चपलांचा हार घालून दहन करण्यात आले. मुख्य चौकात साडे दहा वाजेपर्यंत रस्ता रोको केला. शेतक-यांवर बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांना पदावरून दूर करावे यासाठी एकशे वीस लिटर दूध रस्त्यावर ओतले. भाजपनेते माधव भंडारीं यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सिताराम देशमुख उपस्थित होते. ब्राह्मणवाडा येथील शेतकरी संपात सहभागी झाला. स्वयंस्फूतीर्ने दुधसंकलन व भाजीपाला विक्री बंद ठेवून तसेच रस्त्यावर दूध ओतून संपात सहभाग नोंदवला. एकाही शेतक-याने आपला भाजीपाला ओतूर मार्केटला नेला नाही. ब्राह्मणवाडा गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचलित तसेच श्रीकृष्ण दूध डेअरी व खासगी दूध संकलन केंद्रांनी स्वयंस्फूतीर्ने दूध संकलन बंद ठेवले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्व दूध उत्पादक शेतकरी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्र येत कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यावर दूध ओतून राज्य शासनाचा निषेध केला. या आंदोलनात उपसरपंच भारत आरोटे, श्रीकृष्णचे संस्थापक लक्ष्मण आरोटे, गोकूळ आरोटे अध्यक्ष धोंडिभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष भीमा आरोटे, सोसायटीचे अध्यक्ष पोपट हांडे, उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, बबन फलके, माजी सरपंच देवराम गायकर व शेतकरी सहभागी झाले होते.