अहमदनगर : होळी, धूलिवंदन आणि त्यानंतर चार दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीनिमित्त बाजारपेठेतही रंग भरला आहे़ मंगळवारी होळीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारी होळी घरोघरी साजरी केली जाते़ शेणाच्या गोवऱ्या आणि लाकडांची होळी पेटविण्याची परंपरा आजही जोपासली जाते़होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्यांची मंगळवारी दिवससभरात मोठी खरेदी-विक्री झाली़ बाजारपेठेवर मात्र, काही प्रमाणात दुष्काळाचे सावट जाणवले़ नगर परिसरात राहणारे शेतकरी व शहरातील गवळी बांधवांनी होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्यांची गेल्या दोन महिन्यांपासून तयारी केली होती़ चार गोवऱ्या, एक उसाचा वाढा २० ते ३० रुपयांना विक्री करण्यात आला़ शहरात शेणाच्या गोवऱ्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली़ शहरातील टिळकरोड, बसस्थानक, झोपडी कॅन्टीन, येथे साहित्य खरेदीसाठी गर्दी होती़ (प्रतिनिधी)कोरड्या होळीचे आवाहन : धूलिवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो़ या रंगात असलेल्या आॅक्साईड, कॉपर सल्फेट, अॅल्युमिनियम ब्रोमाईड, प्रशियन निळ, मर्क्युरी सल्फाईटमुळे हे रंग शरीराला अपायकारक ठरतात़ रंग खेळताना इकोफ्रेंडली रंगांचा वापर करावा, असे आवाहन विविध सामाजिक संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे़ हरियाली संस्थेच्यावतीने इकोफ्रेंडली होळीबाबत पत्रके वाटून जनजागृती केली जात आहे़ ४्रपाणीटंचाई असल्याने कोरडी होळी खेळून पाणी बचत करण्याची गरज आहे तसेच होळीत उसाचे वाढे व गव्हाच्या ओंब्या टाकल्या जातात़ दुष्काळात हा अपव्यही टाळावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे़
होळीने भरला बाजारात ‘रंग’
By admin | Updated: March 22, 2016 23:53 IST