शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात १० हजार गणेश मुर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:39 IST

कोपरगावात राबविलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन’ उपक्रमात सुमारे १० हजार गणेश मुर्तींचे संकलन झाले.

कोपरगाव : समता चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लबच्या वतीने राबविलेल्या कोपरगावात राबविलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन’ उपक्रमात सुमारे १० हजार गणेश मुर्तींचे संकलन झाले. समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचा-यांनी संकलित केलेल्या गणेश मूर्ती बुधवारी गोदावरी इंडस्ट्रियल वर्क्सच्या प्रांगणात तहसीलदार किशोर कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, समता परिवाराचे प्रमुख काका कोयटे, दिलीप दारूणकर, दिनेश दारूणकर, नगरसेवक रवींद्र पाठक, सत्येन मुंदडा, संचालक मोहन झंवर, तुलसीदास खुबाणी, लायन्सचे अध्यक्ष सुरेश शिंदे, किरण शिरोडे, सुहासिनी कोयटे, संदीप कोयटे, स्वाती कोयटे, प्रसाद कातकाडे, मारूती काकड आदी उपस्थित होते. शहर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी पालिकेच्या सहकार्याने गणेश विसर्जन शांततेत झाल्याचे सांगून समता व लायन्सच्या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातर्फे आभार मानले. व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी प्रास्ताविक केले. राम थोरे यांनी सूत्रसंचालन केले.खडू, खत निर्मिती होणारसंकलित गणेश मुर्तींचे हौदात अमोनियम कार्बोनेटद्वारे विघटन करून खत व खडू निर्मिती केली जाणार आहे. समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात शाडू मातीपासून ८०० गणेश मूर्ती बनविल्या. दुस-या टप्प्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदी पात्रात विसर्जित न करता समता व लायन्स क्लबकडे देण्यासाठी प्रबोधन केले. तिस-या टप्प्यात गणेश मुर्तींचे संकलन केले.