शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर न्यूमररी’ पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

By | Updated: December 5, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाईल. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मराठा समाजातील अभ्यासक राजेंद्र कोंढरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, ॲड. श्रीराम पिंगळे, प्रा. एम.एस. तांबे, शिवप्रहारचे संस्थापक संजीव भोर आदी उपस्थित होते.

या बैठकीत सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविणे आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या विषयांवर चर्चा झाली. मराठा समाजातील अभ्यासकांनी ‘सुपर न्यूमररी’ जागा वाढविणे कसे योग्य आहे, ते मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. या पद्धतीने जागा वाढविल्यास अन्य प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर सांगितले. त्यावर सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपस्थित सर्व मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. एसईबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ‘सुपर न्यूमररी’बाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी ते दिल्लीतील कायदेशीर सल्लागारांसमवेत चर्चा करणार आहेत. एमपीएससी, महावितरण आदी विविध विभागांमधील समांतर आणि एसईबीसी आरक्षणातील विविध पदांच्या नियुक्त्यांबाबतही चर्चा झाली. त्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

चौकट

‘लोकमत’ने मांडला मुद्दा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न ‘लोकमत’ने ‘एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी’ या वृत्ताद्वारे दि. २१ नोव्हेंबर रोजी मांडला होता.