शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या मधाला क्लस्टरची गोडी

By admin | Updated: October 21, 2023 20:37 IST

जिल्ह्यातील विविध प्रक्रिया उद्योगांना गती मिळण्याची चिन्हे आहेत़

अहमदनगर: जिल्ह्यातील विविध प्रक्रिया उद्योगांना गती मिळण्याची चिन्हे आहेत़ पालकमंत्र्यांच्या अकोले तालुक्यात उत्पादित केल्या जाणार्‍या मधावर प्रक्रिया करण्यासाठी क्लस्टर उभारण्यात येत असून, मध उत्पादकांचा गट स्थापन करण्यात आला आहे़ त्यामुळे अकोल्याच्या मधाला वेगळीच चव येणार आहे़ उद्योगांना चालना मिळावी, यासाठी केंद्र शासनाने क्लस्टर योजना आणली़ इतर शहरात क्लस्टर कधीच सुरू झाले़ क्लस्टरच्या माध्यमातून नवनवे तंत्रज्ञान तिथे पोहोचले आहे़ औद्योगिक विकासाला यामुळे गती मिळाली़ नगर मात्र त्यास अपवाद होते़ सुरुवातीला क्लस्टरला शून्य प्रतिसाद होता़ उशिरा का होईना पण नगरच्या उद्योजकांना क्लस्टरचे महत्व समजले़ अ‍ॅटो इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारे उद्योजक एकत्र आले व त्यांनी क्लस्टरसाठी प्रस्ताव पाठविला़ त्यास केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला़ नागापूर येथील औद्योगिक वसाहतीत क्लस्टरच्या इमारतीचे काम सुरू आहे़ जिल्ह्यात प्रथमच हा प्रकल्प सुरू होत आहे़ या धर्तीवर केंद्राने तालुकास्तरावरही हा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्‍यांनी अकोले तालुक्यात चाचपणी केली़ अकोले तालुक्यात मोठ्याप्रमाणात मधाचे उत्पादन होते़ मधाचे उत्पादन करणार्‍या २० उत्पादकांचा गट स्थापन करण्यात आला आहे़ त्यांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला़ या उत्पादक समूहासाठी हे क्लस्टर उभारले जाणार आहे़ जिल्ह्यात विविध वस्तुंचे उत्पादन केले जाते़ मात्र त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग बोटावर मोजण्याइतकेच आहेत़ प्रक्रिया करणे खर्चिक बाब आहे़ ते सामान्यांच्या आवाक्या पलीकडचे आहे़ यंत्राच्या किमतीही भरमसाठ आहेत़ ती विकत घेणे शक्य नाही़ प्रक्रिया करणे शक्य व्हावे,यासाठी क्लस्टर हा पर्याय समोर आला़ एकाच वस्तुचे उत्पादन करणारा समूह एकत्र आल्यास त्यांना ही यंत्रणा मोफत पुरविली जाते़ जागा व इमारत उभारणे उत्पादकांवर बंधनकारक आहे़ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मशिनरी पुरविली जाणार आहे़ अकोले तालुक्यात मोठ्याप्रमाणात मधाचे उत्पादन केले जाते़ त्यावर क्लस्टरमध्ये प्रक्रिया करून विक्री केली जाणार असल्याचे सांगण्यात आले़ प्रत्येक तालुक्यात क्लस्टर उभारण्याचे प्रस्तावित आहे़ विविध तालुक्यात चाचपणी सुरू आहे़ अकोले तालुक्यातील मध उत्पादकांसाठी क्लस्टर उभारणे शक्य असून, मधावर प्रक्रिया करणारे क्लस्टर उभारण्यात येणार आहे़ - एस. एस. गवळी, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, नगर.