महिलांना एमआरपीच्या केवळ २५ टक्के भरून आवडत्या साड्या खरेदी करता येणार आहेत. या सवलतीमुळे १४००० रुपयांची साडी फक्त ३५०० रुपये, ५७९४ ची साडी १४५० आणि २४९५ची साडी फक्त ६२५ रुपयांत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लग्नसमारंभासाठी वापरण्यात येणारे सूट्स, शेरवानी, इंडो वेस्टर्न, जोधपुरी, सलवार कुर्ता अशा पुरुषांच्या विशेष पोषाखांच्या खरेदीसाठीही ७० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचे शर्ट, टी-शर्ट, डेनिम्स आणि ट्राऊजर्ससाठीदेखील ७० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. महिलांना कुर्तीज्, ट्युनिक्स, ड्रेसेस, गाऊन्स, टॉप्स, ब्रँडेड कॅज्युअल्स हे सर्व कपडे ७५ टक्के कमी भावात घेण्याची संधी आहे. मार्च एण्डनिमित्त आम्ही आता असलेला सर्व स्टॉक विक्रीसाठी काढत आहोत आणि नवीन वर्षात ग्राहकांसाठी नवा स्टॉक आणणार असल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. (वा.प्र.)
मार्च एण्डमुळे सिलाई वर्ल्डमध्ये खरेदीपेक्षा कमी भावात कपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST