शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 12:26 IST

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२३ फेब्रुवारी) अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावागावातून तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

अकोले : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२३ फेब्रुवारी) अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावागावातून तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.दरम्यान सकाळी अकोले तालुक्यातील इंदोरी ते अकोले नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांनी गर्भलिंग निदान प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला होता. यावेळी इंदोरीकर महाराजांना काळे फासण्याचा इशारा देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांना अकोले तालुक्यात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार करीत बंद पाळला. अकोले तालुक्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ ठराव केला. अकोले येथे सकाळी ११ वाजता सभा झाली. अध्यक्षस्थानी विष्णू महाराज वाकचौरे हे होते. प्रास्ताविक दीपक महाराज देशमुख यांनी केले. याप्रसंगी योगी केशवबाबा, माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार किरण लहमटे, मधुकर नवले, स्मिता अष्टेकर, माजी आमदार वैभव पिचड, योगी केशव चौधरी, अशोक भांगरे, सीताराम गायकर, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, वकील के.डी.धुमाळ,  मच्छिंद्र धुमाळ, वसंत मनकर, मारुती मेंगाळ, महेश नवले, अमित भांगरे, सतिष भांगरे, मंदाबाई नवले, विवेक महाराज केदार, फरगडे महाराज यावेळी उपस्थित होते. निवृत्ती महाराजांच्या नादी लागू नको. ही अकोलेची माती आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती वाकचौरे यांनी यावेळी दिला. अकोल्यातील सर्व महिलांनामध्ये मला आज स्मिता अष्टेकर दिसतात. या तालुक्यातील सर्व महिला वाघिणी आहेत, असे अष्टेकर यांनी म्हणाल्या. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले