शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शाळा स्पर्धेत नेप्तीची शाळा देशात चौथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:58 IST

अहमदनगर : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ शाळा या स्पर्धेत नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद ...

ठळक मुद्देशाळेने ५० हजार रुपयांचे बक्षिस पटकावले नेप्तीत आनंदोत्सव साजरा१ सप्टेंबर रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण

अहमदनगर : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ शाळा या स्पर्धेत नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने देशात चौथा क्रमांक मिळवला आहे. शाळेने ५० हजार रुपयांचे बक्षिस पटकावले आहे. १ सप्टेंबर रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या यशामुळे नेप्तीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी हा उपक्रम देशभर राबविला. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणाºया व आरोग्य माहितीचे प्रसारण करून इतरांना प्रेरणा देणाºया शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात नेप्तीच्या शाळेने देशात चौथा क्रमांक मिळविला़ यासाठी पाच क्षेत्रे निवडण्यात आली होती. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठी व्यवस्था, स्वच्छता सुविधांची देखभाल, स्वच्छतेच्या सवयींची रुजवणूक यांचा यात समावेश होता. यात  विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था हा प्रमुख मुद्दा होता तसेच या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक स्थानिक ग्रामस्थ यांचा सहभाग कसा आहे, यावर भर देण्यात आला. या सर्व निकषांत नेप्ती येथील शाळा यशस्वी ठरली.देशातील १७२ पारितोषिक प्राप्त शाळांमधे नेप्तीच्या शाळेला चौथा क्रमांक मिळाला़ याची माहिती मिळताच शिक्षक व गावक-यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पुरस्काराची ५० हजारांची रक्कम शाळा स्वच्छतेच्या उपक्रमासाठी खर्च करणार आहे, असे मुख्याध्यापक आबा लोंढे यांनी सांगितले. स्वच्छतेच्या उपक्रमात एकनाथ व्यवहारे, हिराबाई सोनवणे, रंजना गाडीलकर, मीना जाधव यांचे सहकार्य मिळाले. यशाबद्दल माजी सभापती संदेश कार्ले, अशोक कडूस, रमाकांत काटमोरे, अभय वाव्हळ, चंद्रकांत सोनार, रंगनाथ सोनवणे, व्यंकटेश बिराजदार, सरपंच मीनाताई जपकर आदींनी कौतुक केले़