शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अकाली निधन झालेल्या तरूणाच्या कुटुंबीयांना वर्गमित्रांनी दिला आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:23 IST

केडगाव : अवघ्या ३४ वर्षे वयाच्या तरुणाचे अकाली निधन झाले. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती मिळताच वर्गमित्रांनी एकत्र ...

केडगाव : अवघ्या ३४ वर्षे वयाच्या तरुणाचे अकाली निधन झाले. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची माहिती मिळताच वर्गमित्रांनी एकत्र येत अकाली निधन झालेल्या वर्गमित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. अवघ्या २ दिवसांत ८० हजार रुपये जमा करत मयत वर्गमित्राच्या दोन्ही लहान मुलांच्या नावावर पोस्टात ठेव पावत्या करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

सारोळा कासार (ता. नगर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि २००१ साली दहावीची परीक्षा दिलेल्या वर्गमित्रांनी ३-४ वर्षांपूर्वी एक व्हाॅट‌्सॲप ग्रुप बनविलेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व वर्गमित्र एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असतात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. या ग्रुपमधील सचिन पांडुरंग चारुडे (वय ३४, रा. अस्तगाव, ता. पारनेर) याचे ६ मे रोजी अल्प आजाराने अकाली निधन झाले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. ही घटना के. बी. पी. व्ही. २००१ ग्रुपला समजताच प्रत्येकजण हळहळला. मात्र, या दु:खातून सावरत वर्गमित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्गमित्रांना मदतीसाठी आवाहन केले. अवघ्या २ दिवसांत ८० हजारांचा मदतनिधी जमा झाला. या पैशांतून मयत वर्गमित्राच्या दोन्ही लहान मुलांच्या नावे पोस्टात प्रत्येकी ४० हजारांच्या ठेव पावत्या करण्यात आल्या आहेत.

या उपक्रमासाठी साध्वी शोभा कवडे, सविता वराळे, सविता पुंड, सोमनाथ झेंडे, विजय देवखुळे, सुनील देवखुळे, संदीप कडूस आदींनी परिश्रम घेतले.