शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बांधाचा वाद : सहा जणांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:30 IST

येथील फौजदारी न्यायालयाने टाकळी मानूर येथे शेतीच्या बांधावरून २०१२ मध्ये झालेल्या भाऊबंदांच्या मारहाणीच्या खटल्यात सहा आरोपींना सहा महिने कैद व नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पाथर्डी : येथील फौजदारी न्यायालयाने टाकळी मानूर येथे शेतीच्या बांधावरून २०१२ मध्ये झालेल्या भाऊबंदांच्या मारहाणीच्या खटल्यात सहा आरोपींना सहा महिने कैद व नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.आसिफ मुसा शेख यांची टाकळीमानुर शिवारात शेती असून ते त्यांचे आई-वडील भाऊ-भावजय यांच्यासह टाकळीमानूर येथे राहतात. आसिफ शेख यांच्या शेता शेजारी त्यांचे चुलते रशीद बाबुलाल शेख यांची शेती असून दोघांच्या शेती दरम्यान सामायिक बांध आहे. १६ जून २०१२ रोजी सायंकाळी फियार्दी आसिफ शेख व आरोपी बशीर बाबुलाल शेख,समीर बशीर शेख,रशीद बाबुलाल शेख,शाकीर रशीद शेख,जाकीर रशीद शेख,इर्षाद शेख सर्व राहणार टाकळी मानूर यांची शेताच्या बांधावरून वाद झाला होता वादाचे पर्यावसन तुफान हाणामारीत होऊन आरोपींनी फियार्दीला लोखंडी पाईपने डोक्यात व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती त्या मारहाणीत आसिफ शेख गंभीर जखमी झाले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी आसिफ शेख यांच्या फियार्दीवरून आरोपींविरुद्ध भादवि कलम ३२४ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.सदरचा खटला न्यायालयात सुनावणी आला असता सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ ज्योती पी. सरपाते यांनी वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींचे वैद्यकीय प्रमाणपत्र व साक्ष तसेच पोलिसांनी गुन्ह्याचे कामी जप्त केलेले हत्यार लोखंडी पाइप यासह इतर साक्षीदारांच्या जबाब इत्यादी सबळ पुरावे ग्राह्य धरून सहाही आरोपींना सहा महिने साधी कैद व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.शिवाजीराव दराडे यांनी काम पाहिले. केवळ तीन हात जमिनीसाठी चुलता पुतण्यायांच्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे चुलत्याला शिक्षा सुनावल्या मुळे हा खटला तालुक्यात चचेर्चा विषय बनला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर