शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या टाळ-मृदुंगाचा पंढरीच्या वारीत नाद!

By admin | Updated: June 27, 2016 00:59 IST

अरुण वाघमोडे , अहमदनगर वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या या वाद्यांना आषाढी वारीनिमित्त मागणी वाढली असून, सध्या हे साहित्य खरेदी

अरुण वाघमोडे , अहमदनगरवारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या या वाद्यांना आषाढी वारीनिमित्त मागणी वाढली असून, सध्या हे साहित्य खरेदी व दुरुस्तीसाठी वारकऱ्यांची लगबग सुरू आहे़ पारंपरिक प्रकारात मोडणारी ही वाद्ये हातानेच बनविली जात असल्याने नगर शहरात अवघ्या दोन ते तीन ठिकाणीच विक्री व दुरुस्ती केली जाते़ शहरात थेट खानदेश व मराठवाडा येथील वारकरी ही वाद्ये खरेदीसाठी येत असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले़ आषाढी वारी जवळ आली की हरिनामाच्या गजरासह टाळ, मृदुंग, वीणा, चिपळ्या, लेझीम यांचा सर्वत्र नाद घुमतो़ भजन व कीर्तनासाठी लागणाऱ्या वाद्यांची व्यवस्था केली जाते़ ही वाद्ये सहज उपलब्ध होत नसल्याने हस्तकलेत माहीर असलेल्या कारागिरांकडेच ती दुरुस्त केली जातात़ आषाढी एकादशी २० दिवसांवर येऊन ठेपल्याने या कारागिरांकडे सध्या वारकऱ्यांची गर्दी दिसत आहे़ पंढरीची वाट तुडविताना हरिनामाचा गजर करत दिंडी सोहळा पुढे सरकतो़ तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन सोहळा होतो, यासाठी या वाद्यांची गरज भासते़ आषाढी वारीला निघालेले खानदेश, मराठवाड्यातील बहुतांशी दिंडी सोहळे नगर शहरातून जातात़ येथे मुक्काम करून पुढे मार्गस्थ होतात़ यावेळी दिंडीमधील वारकऱ्यांकडून कीर्तन-भजनासाठी लागणाऱ्या वाद्यांची नगर येथून खरेदी केली जाते़ अनेक दिंडी सोहळ्यांमध्ये भजन, कीर्तनासह लेझीम, भारुड, गोंधळ यासह विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने यासाठी पारंपरिक वाद्याची गरज भासते़ हार्मोनियम, तबला, मृदुंग, वीणा, हलगी, ढोलकी आदी कच्चा माल आणून हाताने तयार केले जाते़ हे साहित्य तयार करणारे कारागीर नगरमध्ये अगदी कमी आहेत़ आषाढी वारी म्हणजे कारागीर आणि हे साहित्य विक्रेत्यांसाठी एक चांगली संधी असते़ गेल्या सात ते आठ दिवसांत जिल्ह्णात पावसाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साह संचारला असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे साहित्य विक्रेत्यांनी सांगितले़