शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

नगरकरच ‘नंबर वन’

By admin | Updated: June 3, 2014 00:28 IST

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत पुणे विभागात यंदाही नगरकरच नंबर वनवर राहिले.

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत पुणे विभागात यंदाही नगरकरच नंबर वनवर राहिले. नगरचा एकूण निकाल ९२.५८ (नवीन अभ्यासक्रम) टक्के लागला. जिल्ह्यात पारनेरने (९६.२३) बाजी मारली. मागील वर्षीच्या (८७.७५) तुलनेत टक्केवारीतही वाढ झाली आहे. पुणे (९०.४९) तर सोलापूर ८९.२ तिसर्‍या स्थानी आहे. पुनर्परीक्षार्थींमध्येही (४४.९०) नगरच अव्वल आहे. नगर जिल्ह्यातून ५३ हजार ७२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५३ हजार ६५१ पात्र ठरले. ४९ हजार ६६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील २८ हजार ४०६ मुले तर २१ हजार २६३ मुली उत्तीर्ण झाल्या. २ हजार १९३ जणांनी विशेष श्रेणी, १९ हजार ३५९जणांनी प्रथम श्रेणी, २६ हजार ४०८ द्वितीय श्रेणी तर १ हजार ७०९जणांना सामान्य श्रेणी मिळाली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९६.३५ मुली व ७९.९४ टक्के मुले उत्तीर्ण झाले. विज्ञान विभागाचा ९६.३०, कला ८७.९१, वाणिज्य ९३.४५ व व्होकेशनलचा ९०.९२ टक्के निकाल लागला. विज्ञानमध्ये २४ हजार ३८२ पैकी २३ हजार ४८०, कलामधून २० हजार ४६१ पैकी १७ हजार ९८७, वाणिज्यमधून ७ हजार ६५१ पैकी ७ हजार १५० व व्होकेशनलचे १ हजार १५७पैकी १ हजार ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

मुलीच हुशार..!

 

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा देखील जिल्ह्यात मुलींनी बाजी मारलेली आहे. जिल्ह्यात ९६.३५ मुुली परीक्षेसाठी बसल्या होत्या त्यातील ८९.९४ टक्के उत्तीर्ण झालेल्या आहेत. तालुकानिहाय आकडेवारीत पारनेर तालुक्यातील ९६.२३ टक्के विद्यार्थी पास झालेले आहे. सोमवारी आॅनलाईन पध्दतीने बारावीचा निकाल जाहीर झाला. यंदा बारावीसाठी ५३ हजार ६५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून ४९ हजार ६६९ विद्यार्थी पास झालेले आहेत. ३१ हजार ५८२ मुलांपैकी २८ हजार ४०६ विद्यार्थी पास झालेले असून, २२ हजार ०६९ मुलींपैकी २१ हजार २६३ मुली पास झालेल्या आहेत. सर्वाधिक मुली पारनेर तालुक्यातून ९८.८३ टक्के तर सर्वाधिक मुले पाथर्डी तालुक्यातून उत्तीर्ण झालेले आहेत. मुलींचे सर्वात कमी पास होण्याचे प्रमाण ९३.७९ टक्के अकोले तालुक्यात तर सर्वात कमी मुले पास होण्याचे प्रमाण नेवासा तालुक्यात ८५.४ टक्के आहे. तालुकानिकाय कामगिरीत राहाता तालुका जिल्ह्यात अव्वल असून सर्वात कमी निकाल अकोले तालुक्यातील ८९. ५३ टक्के आहे. नव्वद टक्के पेक्षा कमी निकाल असणारा अकोले हा एकमेव तालुका ठरला आहे. जुन्या अभ्यासक्रमात देखील मुलींची आघाडी असून जिल्ह्यात ५०.५० मुली तर ४३.५५ टक्के मुले जुन्या अभ्यासक्रमात पास झालेले आहेत. (प्रतिनिधी)

 

कोपरगावचा निकाल ९० टक्के

 

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ९०़१२ टक्के लागला़ बारा कनिष्ठ महाविद्यालयांतून संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे़ कोपरगाव तालुक्यातून बारावीच्या परीक्षेसाठी ३ हजार ५५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले़ पैकी ३ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ त्यातून ३ हजार १९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ म्हणजेच तालुक्याचा निकाल ९०़१२ टक्के लागला़ के.बी़ रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८९़२४ टक्के लागला़ विज्ञान विभागात प्रथम- प्रथमेश मुरूमकर, द्वितीय- शुभम गायकवाड व तृतीय आरती रक्ताटे़ वाणिज्य विभागात प्रथम- वैशाली खैरनार, द्वितीय- सृष्टी गिड्डे, तृतीय- निलीमा नानकर, कला शाखेत प्रथम- नीरजकुमार लोंढे, द्वितीय- चित्रा लोकनर, तर तृतीय क्रमांक प्रेरणा सैदाणे हिने मिळविला़ एसएसजीएम महाविद्यालयाचा निकाल ८६ टक्के, पोहेगाव येथील गणपतरराव औताडे महाविद्यालय ८७़५०, कोळपेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाविद्याल ७८़७८, राधाबाई काळे कन्या महाविद्यालय ९७़९८, सी़ एम़ मेहता कन्या महाविद्यालय ९७़९६, गोधेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल - ९७़५०, ओम गुरूदेव- ९०़४१, संवत्सर येथील नामदेवराव परजणे महाविद्यालय ९८़६९, कोपरगाव येथील परजणे महाविद्यालय ९३़५५, कासली येथील कमलाताई बी़एस़ टेक्निकल कॉलेज ६३़६४ टक्के निकाल लागला़ (प्रतिनिधी)

 

मागील वेळी दुष्काळी दक्षिण भागाने उत्तरेवर आघाडी घेतली होती. यंदाही पहिल्या तीनमधील दोन तालुके दक्षिणेतील आहेत. पारनेर, संगमनेर व पाथर्डी पहिल्या तीनमध्ये आले. सर्वात कमी निकाल नेवासा (८९.१२) तालुक्याचा आहे. तालुकानिहाय निकाल : अकोले ८९.५३, जामखेड ९४.३३, कर्जत ९२.४५, कोपरगाव ८९.७२, नगर ९१.६, नेवासा ८९.१२, पारनेर ९६.२३, पाथर्डी ९५.५२, राहाता ९३.६०, राहुरी ९२.५७, संगमनेर ९६.१, शेवगाव ९२.४९, श्रीगोंदा ९१.८२ व श्रीरामपूरचा ९१.९१ टक्के निकाल लागला. विशेष म्हणजे या निकालात सर्वच तालुके हे ९० टक्क्यांवर आहेत. जिल्ह्यात पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४४ टक्के लागला. यातही नगर विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या (३३.४२) तुलनेत यंदा टक्केवारीही वधारली आहे. जिल्ह्यात ३ हजार १९५जणांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार १०९जण पात्र ठरले. १ हजार ३९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञानमध्ये ५५२पैकी ३५०, कलामध्ये १ हजार ८२३पैकी ८२८, वाणिज्यमध्ये ६९८पैकी २०४ व व्होकेशनलचे ३६पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पारनेरकर टॉपर अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागातीलच मुले हुशार असल्याचे पुन्हा यंदा बारावीच्या निकालाने सिद्ध केले. गेल्या वर्षीही उत्तरेच्या तुलनेत निकाल चांगला लागला होता. यंदाही पारनेर तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पारनेर, संगमनेर व पाथर्डी अनुक्रमे पहिल्या तीनमध्ये आले. सर्वात कमी निकाल नेवासा (८९.१२) तालुक्याचा आहे. तालुकानिहाय निकाल : अकोले ८९.५३, जामखेड ९४.३३, कर्जत ९२.४५, कोपरगाव ८९.७२, नगर ९१.६, नेवासा ८९.१२, पारनेर ९६.२३, पाथर्डी ९५.५२, राहाता ९३.६०, राहुरी ९२.५७, संगमनेर ९६.१, शेवगाव ९२.४९, श्रीगोंदा ९१.८२ व श्रीरामपूरचा ९१.९१ टक्के निकाल लागला. विशेष म्हणजे या निकालात सर्वच तालुके हे ९० टक्क्यांवर आहेत. (प्रतिनिधी)

 

१० जूनला मिळणार निकालपत्र

 

अहमदनगर : राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सोमवारी बारावीचा निकाल आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रक १० पासून संबंधीत शाळेत मिळणार असल्याची माहिती प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी पावसे यांनी दिली. दरम्यान, काल दुपारी एक वाजल्यापासून शहरातील विविध सायबर कॅफेवर आॅनलाईन निकाल पाहण्यासाठी गर्दी झाली होती. शिक्षण मंडळाच्यावतीने निकाल पाहण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संकेत स्थळावर सुरूवातीला निकाल पाहण्यासाठी उशीर झाला. मात्र, दुपारी दीड नंतर सहजासहजी निकाल पाहता येत होता. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना मेडीकल, इंजिनिरिंग आणि अन्य उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचे वेध लागलेले असतात. मात्र, अद्याप सीईटीचा निकाल लागलेला नसल्याने विद्यार्थ्यांना त्या निकालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात यंदाही निकाली परंपरा चांगली असल्याने काही विशिष्ट विभागात आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, परिस्थितीवर लक्ष ठेवणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

 

बाविसशे विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी

 

अहमदनगर : जिल्ह्यात २ हजार १९३ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. १९ हजार ३५९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. जिल्ह्यात ५३ हजार ६५१ विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमानुसार बसले होते. २६ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर १ हजार ७०९ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.(प्रतिनिधी)