शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या बजेटची मिटिंग अवांतर विषयातच विरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेची २०२१ - २०२२ या वित्तीय वर्षातील २२० कोटींचे बजेट सादर करून त्यास खर्चाची मंजुरी ...

कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेची २०२१ - २०२२ या वित्तीय वर्षातील २२० कोटींचे बजेट सादर करून त्यास खर्चाची मंजुरी देण्यासाठी नगर परिषदेच्या सभागृहात गुरुवारी ( दि. २५ ) नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन तास विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र, या सभेत नगरसेवकांनी बजेटमधील खर्चाचा विषय बाजूला ठेवत इतर अवांतर विषयावरील चर्चेतच ही सभा संपली. विशेष म्हणजे सभागृहात उपस्थित असलेल्या महिला नगरसेविका यांनी बजेटविषयी चकार शब्दही काढला नाही.

सकाळी ११ वाजता सभेची सुरुवात झाली. बजेटमधील खर्चाचे विषय वाचण्यात आले. सुरुवातीलाच काही नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीवर चर्चा सुरु केली. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील पालिकेच्या मालकीचे गाळे ज्यांना दिले आहेत. ते भाडे अथवा डिपॉझिट देत नसतील, तर त्यांना बाहेर काढा. काही गाळ्यात अवैध धंदे सुरू आहेत. त्यांचा बंदोबस्त करा, ज्यांनी हे गाळे घेतले आणि दुसऱ्याला परस्पर विकून टाकले, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. तसेच आजही काही गाळे तसेच पडून आहेत. त्यांचे लिलाव करा, २७ वर्षाचे करार करा. शहरात अनेक रिकामे प्लॉट आहेत. त्यांचे मालक त्यांची निगा राखत नाहीत. त्यामुळे मोठा त्रास होतो. तसेच घरपट्टी आकारताना त्यांचे फेर सर्वेक्षण करा. त्यांनाही कर सुरु करा जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असे सांगण्यात आले.

या विषयावर पडता पडतो न पडतो तोच प्रभागातील समस्या आणि सूचनांचे चर्चासत्र सुरु झाले. त्यात कोणी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेने प्रभागात, उपनगरात मोठ्या प्रमाणात बोअर घ्यावे, काही उपनगरात विहिरी आहेत, त्या ताब्यात घेऊन नागरिकांना तेथून पाणी द्यावे. तसेच काही ठेकेदार हे फक्त कामे घेऊन ठेवतात. वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे ज्या गाळेधारकांनी आजतागायत डिपॉझिटची रक्कम दिली नाही त्यांचे गाळे सील करा, अशी भूमिका नगराध्यक्षानी घेतली. अशा अन्य विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोन तासांनी बजेटचा मुद्दा बाजूला राहून सभा संपन्न झाली.

............

बजेटच्या खर्चावर चकार शब्द नाही

बजेटच्या सभेत उपस्थित नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, यावर दोन तास चर्चा केली. मात्र, त्याच उत्पन्नातून होणाऱ्या २२१ कोटींच्या खर्चाची मंजुरी देण्यात यावी, यासाठी आयोजित केलेल्या सभेत एकाही नगरसेवकाने बजेटमधील खर्चाविषयी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे उत्पन्न कितीही वाढले, तरी होणारा खर्च हा योग्य आहे की नाही, हे न तपासता खर्चाला मजुरी दिली जाते. याला नगरसेवकांचे औदार्यच म्हणावे लागेल.

.............

सभेतील खुर्च्या रिकाम्या...

विशेष म्हणजे इतर सर्वच सर्वसाधारण सभेला, मासिक बैठकीला आवर्जून हजर राहणाऱ्या अनेक नगरसेवकांनी या बजेटच्या सभेला दांडी मारली. त्यामुळे सभागृहातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.

............

२५- बजेट सभा - कोपरगाव