शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्त्व कायदा राज्यात लागू होणार नाही-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:52 IST

नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अहमदनगर : नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. थोरात म्हणाले, या कायद्यासंदर्भात रस्त्यावर व न्यायालयातही विरोध सुरु आहे. त्यामुळे हा कायदा लागू होऊ नये या मताचे आम्ही आहोत. थोरात यांच्यावर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र हे पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, मााझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. तसेच विधिमंडळाचे पक्षनेतेपदही आहे. या जबाबदा-या सांभाळताना पालकमंत्रीपदाला न्याय देणे अवघड होईल. त्यामुळे पक्षातील इतर मंत्र्याला ही संधी मिळावी ही आपली प्रारंभीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे हे पद नाकारले आहे. नगरचे पालकमंत्री पद मला हवे होते म्हणून मी हा नकार दिला असे अजिबात नाही. नगरचेही पालकमंत्रीपद मला नको आहे. तसेही जिल्ह्याचे पालकत्व माझ्याकडेच असल्याने त्यासाठी खास पदाची आवश्यकता नाही. महसूलमंत्री म्हणून काम करताना सेतूच्या कामात सुरळीतपणा कसा आणता येईल. तसेच शेतक-यांचे मोजणीचे प्रश्न कसे निकाली निघतील याबाबत आपण विशेष दक्षता घेणार आहोत. महसूलमंत्री म्हणून काम करताना यापूर्वी महसूल प्रशासन आॅनलाईन करुन आपण कामात गतिमानता आणली होती. भाजप सरकारच्या काळात त्यास खीळ बसली. आता पुन्हा एकदा महसूल विभाग गतीमान करु, असे ते म्हणाले.फडणवीसांनी चांगला ज्योतिषी पहावा हे सरकार अधिक काळ टिकणार नाही या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, फडणवीस म्हणाले होते, त्यांना २२० पेक्षा जास्त जागा मिळतील. ते असेही म्हणाले होते की विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या जागा विरोधकांना मिळणार नाहीत. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली. त्यामुळे फडणविसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेरPoliticsराजकारण