पारनेर : विषारी दारूमुळे नगर जिल्ह्यात पांगरमलसह इतर ठिकाणी पंधरा जणांचा बळी गेला. ही गंभीर बाब असून, त्याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे़ अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्यात हलगर्जी करणारे पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी व उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन कारवाईची माहिती दिली़ या कारवाईवर मात्र अण्णांनी नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)
‘बनावट दारू रॅकेटची सीआयडी चौकशी करा’
By admin | Updated: April 10, 2017 03:44 IST