शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अक्षतांऐवजी नवरदेवाला मिळाला चोप : राहुरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 19:24 IST

रविवारी हळदी समारंभ अगदी आनंदात पार पडला.

ठळक मुद्देमुलगी पसंत नसल्याची लग्न मुहूर्ताच्या अर्धा तास आधी उपरती

राहुरी : रविवारी हळदी समारंभ अगदी आनंदात पार पडला.. सोमवारी लग्नसोहळा पार पाडण्यासाठी वधू व वर दोन्हींकडील मंडळी जोरदार तयारी करत होते.. सर्व आवराआवर झाली.. अक्षता वाटपही झाले.. अन् लग्नघटिकेला अर्धा तास शिल्लक असतानाच नवरदेवाला मुलगी पसंत नसल्याची उपरती झाली.. नवरदेवाच्या बोहल्यावर उभे न राहण्याच्या पवित्र्याने लग्नमंडपातील नातेवाईकांची एकच धांदल उडाली.. अनेकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही नवरदेव त्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्याला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे नरवदेवाच्या अंगावर अक्षता पडण्याऐवजी त्याला मार खावा लागला.ही घटना राहुरी शहरातील एका मंगल कार्यालयात सोमवारी (दि.७) दुपारी घडली. नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील एका मुलाचा राहुरी येथील एका मुलीशी सर्व नातेवाईकांच्या संमतीने मुलगा व मुलीच्या पसंतीने विवाह जमला होता. रविवारी (दि.६) सायंकाळी राहुरी येथे विवाहस्थळी हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी (दि.७) दुपारी राहुरी शहरातील रेल्वे स्टेशन रोड लगत आयटीआय कॉलेजजवळ हा विवाह सोहळा होता. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. लग्न लागायला केवळ अर्धा तास वेळ शिल्लक होता. नवरदेवाने अचानक गर्जना करत मला मुलगी पसंत नाही, असे म्हणत लग्नाला साफ नकार दिला. यावेळी काही नातेवाईकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याने न ऐकल्याने अखेर संतप्त झालेल्या नवरीकडील लोकांनी नवरदेवाला एका खोलीत डांबून चांगलेच बदडून काढले. मात्र नवरदेव आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने लोकांनी त्याला व त्याच्या आई-वडिलांना राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. नवरदेवाने लग्नाला नकार का दिला हे मात्र समजू शकले नाही. ऐनवेळी लग्नास नकार देणाऱ्या जेऊर येथील नवरदेवाचे आठ ते दहा दिवसांपूर्वी लग्न जमले होते. ते लग्न का मोडले होते हेदेखील गुलदस्त्यातच राहिले आहे. आठ ते दहा दिवसात त्याच्या आई-वडिलांनी राहुरी येथील मुलगी पाहून दुसरे लग्न जमवले होते. मात्र लग्न सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर मुलाने लग्नाला नकार दिला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी