शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट - बिस्किटांच्या गोडाऊनला भीषण आग : ६० लाखांचा माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 16:33 IST

नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास ) येथील एस.के. एन्टरप्रायजेसच्या चॉकलेट आणि बिस्किटांच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत

केडगाव : नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास ) येथील एस.के. एन्टरप्रायजेसच्या चॉकलेट आणि बिस्किटांच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास ५० ते ६० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी (दि.२०) पहाटे घडली. ही आग सुमारे ९ तास धुमसत होती. महापालिकेच्या अग्निशामक दलाने ७ बंब पाण्याचा मारा करून ही आग नियंत्रणात आणली.केडगाव ते सारोळा कासार रोडवर सोनेवाडी गावाजवळ संदीप फाटक यांच्या मालकीचे एस.के. एन्टरप्रायजेसचे पारले कंपनीचा माल साठविण्याचे गोडाऊन आहे. फाटक यांच्याकडे पारले कंपनीच्या चॉकलेट व बिस्किटांसह विविध खाद्य पदार्थ्यांच्या उत्पादनाची एजन्सी आहे. या गोडावूनमधून नगर शहर व तालुक्यात हा माल वितरीत केला जातो. त्यामुळे या गोडावूनमध्ये त्यांनी सुमारे ५० ते ६० लाखांचा माल साठवून ठेवलेला होता. बुधवारी (दि.१९) सायंकाळी फाटक व त्यांचे कर्मचारी गोडावून बंद करून घरी गेले होते. गुरुवारी पहाटे २ ते २.३० च्या सुमारास गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. गोडावून मधून धूर बाहेर येवू लागल्याने गोडावून शेजारी राहणा-या नागरिकांनी फाटक यांना फोन करून माहिती दिली. फाटक हे केडगाव येथे राहत असल्याने त्यांनी गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने नगर महापालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.अग्निशामक दलाचे वाहन चालक चिंधू भांगरे, फायरमन बाबा कदम, रवींद्र कोतकर, बाळासाहेब घोरपडे, दत्तू शिंदे, पांडुरंग झिने विजय शिंदे, मच्छिंद्र गायकवाड आदींनी घटनास्थळी जावून आगीवर पाण्याचा मारा केला. गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणावर माल असल्याने आणि सर्व मालाला प्लास्टिकचे आवरण असल्याने आग सुमारे ९ तास धुमसत होती. पहाटे पासून सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल ७ बंब पाण्याचा मारा केल्या नंतर आग आटोक्यात आली. परंतु तो पर्यंत सुमारे ५० ते ६० लाखांचा माल जळून खाक झाला असल्याचे संदीप फाटक यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय