शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आजारातून बरी होत चिमुरडी परतली घरी; डॉक्टर,नर्सेसही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 17:24 IST

अहमदनगर : आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी ती सुखरुप आपल्या घरी परतली आहे. येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफही गहिवरला. 

अहमदनगर : आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रविवारी ती सुखरुप आपल्या घरी परतली आहे. येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफही गहिवरला. कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले. पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत तिला निरोप दिला.  ‘कोरोना’ला पराभूत करता येते, हे या चिमुकलीने दाखवून दिले. वेळीच उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो, हा संदेशही यातून पोहोचला.काही दिवसांपूर्वी ही सहा वर्षीय मुलगी आजीसोबत कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती. आजीला त्रास होऊ लागल्याने तपासले असता ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, यातच आजीचा मृत्यू झाला. मात्र, त्या आजीबाईंच्या निकट सहवासितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या आजीबाईंच्या नातीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलीला एकटे वाटायला नको, यासाठी तीचे वडीलही क्वारंटाईन होत या हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्यामुळे मुलीचा एकटेपणा गेला. डॉक्टरांच्या उपचारांनाही तिने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि रविवारी ती बरे होऊन या हॉस्पिटलमधून बाहेर पडली.---अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, हे दिसून आले आहे. त्यासाठी आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याची गरज आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आपण या आजाराला पराभूत करु शकतो, हेच या चिमुरडीने दाखवून दिले आहे.-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक