शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना सांभाळायचा कंटाळा आल्याने मुलांनीच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:22 IST

दशरथ सुखदेव माळी (वय ६०, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांचा खून केल्याच्या ...

दशरथ सुखदेव माळी (वय ६०, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांचा खून केल्याच्या संशयावरून पोलिसांनी मोठा मुलगा रामदास दशरथ माळी (वय २५) व लहान मुलगा अमोल दशरथ माळी (वय १८) (दोघेही रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) या दोघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दशरथ माळी यांचा खून १५ मे रात्री १० ते १६ मे सकाळी ७ च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चिखली येथे झाला होता. त्यांची दोन्ही मुले चिखली येथे वीटभट्टीवर काम करीत होती. दशरथ माळी यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. माळी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक निकिता महाले करीत होत्या. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असता त्यात दशरथ माळी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तपासी अधिकारी महाले यांना संशय वाटल्याने त्यांनी मयत माळी यांच्या दोन्ही मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रामदास व अमोल माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दोन्ही मुलांनी वडिलांचा खून केल्याची कबुली दिल्याचे तपासी अधिकारी महाले यांनी सांगितले. दशरथ माळी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी करण्यात आले, त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मोठा मुलगा रामदास व त्याची पत्नी सविता माळी (वय २३) व त्याचा मित्र अंकुश लोखंडे (वय २३, रा. चिखली, ता. संगमनेर) या दोघांचाही या खुनाच्या घटनेत सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.