शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी पारनेरच्या महाविकास आघाडीचे नेतृत्त्व सोपवले निलेश लंके यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:16 IST

अहमदनगर : पारनेरचा पाणीप्रश्न आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली सोडविला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पाच नगरसेवकांना शिवबंधन बांधल्यानंतर ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसे शिवसेनेच्या मुखपत्रातही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे पारनेर तालुक्याचे नेतृत्त्व आमदार निलेश लंके यांच्याकडे सोपविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अहमदनगर : पारनेरचा पाणीप्रश्न आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली सोडविला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पाच नगरसेवकांना शिवबंधन बांधल्यानंतर ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसे शिवसेनेच्या मुखपत्रातही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे पारनेर तालुक्याचे नेतृत्त्व आमदार निलेश लंके यांच्याकडे सोपविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पारनेरमधील नगरसेवकांची पुन्हा घरवापसी झाली असली तरी शिवसेना व राष्टÑवादी यांच्यातील मतभेद संपतील का? याबाबत साशंकता आहे. नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत हे पक्ष कसे लढणार? याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.पारनेर नगरपंचायतचे शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्टÑवादीत गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते. त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने राष्टÑवादीने या नगरसेवकांना पुन्हा स्वगृही पाठविले आहे. दोन्ही पक्षांनी एकदिलाने हा निर्णय घेतला असे दाखविले जात असले तरी तीन महिन्यांवर आलेल्या नगरपंचायत निवडणुकीत आता हे पक्ष कसे लढणार? याबाबत उत्सुकता आहे. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आता भाजपसोबत युती करु शकणार नाही. तसे झाले तर त्यास राष्टÑवादी आक्षेप घेईल. त्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडीत समाविष्ट होऊनच ही निवडणूक लढावी लागेल. तसे झाल्यास राष्टÑवादीचे आमदार निलेश लंके व सेनेचे माजी आमदार विजय औटी यांना एकमेकाशी जुळवून घ्यावे लागेल. शिवसेना व राष्टÑवादी स्वतंत्र लढले तर या दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच होईल व थेट ठाकरे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागेल. त्यामुळे दोघांसमोरही पेच आहे.

लंके प्रथमच चढले मातोश्रीची पायरीराष्टÑवादीचे आमदार असलेल्या निलेश लंके यांचे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी कौतुक करत तुम्हालाच महाविकास आघाडीची धुरा पारनेरमध्ये सांभाळायची असल्याचे उद्गार काढले असल्याचे लंके समर्थकांचे म्हणणे आहे. लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. मात्र, विजय औटी यांच्यासोबत मतभेद झाल्याने ते सेनेतून बाहेर पडून राष्टÑवादीत गेले. ‘सेनेत असताना आपणाला कधीही मातोश्रीवर येता आले नाही. दोन दशकांनंतर बुधवारी ही संधी आपणाला मिळाली’, अशी भावना आमदार लंके यांनी व्यक्त केली आहे. 

औटी यांना मातोश्रीचा निरोपच नाही ?शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतत असताना सेनेचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी मातोश्रीवर उपस्थित नव्हते. त्यांना बोलविण्यात आले नव्हते असे समजते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या पाच नगरसेवकांनी लेखी पत्र ठाकरे यांना दिले असून त्यात औटी यांच्याबाबत तक्रार केली असल्याचे समजते. मात्र, हे पत्र माध्यमांसमोर उघड करण्यात आलेले नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliticsराजकारण