अहमदनगर : जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतरच जिल्हा विभाजनाचा निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर संगमनेर जिल्हा कृती समितीचे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यासाठी सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.गेल्या ४५ दिवसापासून जिल्हा कृती समितीचे आंदोलन सुरू होत. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना चचेर्साठी निमंत्रित केले होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत समितीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.यावेळी फडणवीस म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, भौगोलिक रचना व लोकसंख्या, प्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुगार्ताई तांबे यांच्यासह कृती समितीचे सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते.
समितीच्या अहवालानंतरच जिल्हा विभाजनाचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:45 IST
जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली असून या समितीच्या अहवालानंतरच जिल्हा विभाजनाचा निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
समितीच्या अहवालानंतरच जिल्हा विभाजनाचा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठळक मुद्देसंगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे